भोगांवकर करणार ‘आप’ला रामराम; चर्चांना उधाण

सातारा : सातारा जिल्ह्यात आम आदमी पार्टीची पाळेमुळे रुजवणारे आणि पक्षाला आपले सर्वस्व मानणारे आम आदमी पार्टीचे सरदार (सागर) भोगांवकर हे आम आदमी पार्टीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या निश्‍चयामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
सातारा जिल्ह्यात दोन वाडे सोडले तर इतर पक्षांना कधीच थारा मिळाला नाही. मात्र, आपल्या कार्यकौशल्याने सरदार (सागर) भोगांवकर यांनी अण्णा हजारेंपासून प्रेरणा घेत त्यांच्या वाटेवरुन चालण्याचे ठरवले. यानंतर कालपरत्वे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची घोषणा केली. केजरीवालांच्या या छोट्याशा पक्षात आपले काय भवितव्य होणार, याचा विचारही न करता भोगांवकर यांनी आम आदमी पार्टीचा झेंडा हाती घेत ते सातार्‍यात आले.
सातार्‍यात जिथे आम आदमी पार्टीला कोठेही स्थान नसताना तेथे भोगांवकर यांनी एक-एक करीत कार्यकर्ते, पदाधिकारी गोळा केले. पक्षाची विचारधारा सातारकरांना समजावून सांगत त्यांना विश्‍वासात घेतले. भोगांवकरांच्या मागे यानंतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी राहिली. भोगांवकरांनी सामान्यांसाठी छेडलेली विविध आंदोलने, निदर्शने या माध्यमातून सातारकरांना आम आदमी पार्टी सातार्‍यात आहे, याचे आकलन झाले. या त्यांच्या कार्याची दखल पक्षपातळीवर घेतली जावून त्यांना नंतर जिल्हाध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार तसेच जिल्हा समन्वयक अशा जबाबदार्‍या देण्यात आल्या. या जबाबदार्‍या पार पाडीत असताना स्वत:चा खिसा रिकामा करीत त्यांनी पक्षाला सातार्‍यात मोठे केले.
सातार्‍यात आम आदमी पार्टीचे कार्य पाहून त्यानंतर पक्षाकडून भोगावकर यांना विविध पक्षांकडून राजकीय आमिषेही देण्यात आली. मात्र, त्याला बळी न पडता भोगांवकर यांनी आपले कार्य सुरुच ठेवले. दरम्यान, त्यांना त्यांच्या अवाक्याच्या बाहेरच्या जबाबदार्‍या देण्याची सुरुवात झाली. पक्षाकडून कोणतीही रसद अथवा वरिष्ठांकडून मदत नसताना अपेक्षांचा डोंगर त्यांच्यासमोर पक्षाने उभा केला. याबाबत भोगांवकर यांनी त्यांच्या हितचिंतकांशी विचारविनिमय केला. यातूनच त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त