पोलीस अधीक्षकांकडून पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 प्रदान
Satara News Team
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
- बातमी शेयर करा
सातारा : श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, मोहरम सण, आषाढी एकादशी यासह विविध सण व उत्सव साजरे केले जाणार आहेत. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार अधिकाराचा वापर करुन दि. 5 जुलै ते 19 जुलै या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व पोलीस अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील/पालखी/दिंडी किंवा जमावातील लोकांनी कशा रितीन चालावे, त्यांनी वागणूक किंवा वर्तणूक कशी ठेवावी, या विषयी निर्देश देणे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, मोहरम, बेंदुर सणाचे अनुषंगाने काढण्यात येणाऱ्या मिरवणूका / पालखी/दिंडी या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे यासाठी योग्य ते आदेश देणे.
सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात व रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्यास व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविणे यांचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षपेकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे यांचा यामध्ये कलम 36 मध्ये समावेश आहे.
#policemukhyalay
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
संबंधित बातम्या
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Thu 27th Jun 2024 03:38 pm
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Thu 27th Jun 2024 03:38 pm











