खटाव येथे मोहिते मळा परिसरात दोन चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने 75 हजार रुपयांचे दोन तोळे चोरले
वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमीSatara News Team
- Fri 17th May 2024 02:39 pm
- बातमी शेयर करा
मायणी : चितळी, ता. खटाव येथे मोहिते मळा परिसरात दोन चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने 75 हजार रुपयांचे दोन तोळे दागिने लंपास केले. यावेळी चोरट्यांशी झालेल्या झटापटीत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून दोघांनाही दहा ते बारा टाके पडले असून दोघांवर उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी, येथील चांगदेव मंदिराजवळ असलेल्या ढाब्याशेजारी नारायण सीताराम माने यांचे घर आहे. नारायण व त्यांची पत्नी राधा असे दोघेच रहातात. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा वाजल्याने राधाबाई नारायण माने (वय 65) यांनी दरवाजा उघडला. दाराबाहेर असलल्या दोघांपैकी एकाने पाणी मागितले. त्या पाणी घेऊन बाहेर आल्या असताना एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावले. त्या आरडा ओरडा करत असताना एकाने त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. आरडाओरडा ऐकून राधाबाई यांचे पती नारायण माने हे देखील बाहेर येऊन चोरट्यांशी झटापट करू लागले. मात्र, चोरट्यांनी त्यांच्यावरही हल्ला करून घटनास्थळावून पळ काढला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी भेट दिली. तसेच गंभीर जखमी असलेल्या माने दाम्पत्याची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. याबाबात वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, या सशस्त्र दरोड्यामुळे चितळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 17th May 2024 02:39 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 17th May 2024 02:39 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 17th May 2024 02:39 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 17th May 2024 02:39 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 17th May 2024 02:39 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 17th May 2024 02:39 pm
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 17th May 2024 02:39 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 17th May 2024 02:39 pm












