जाशीच्या खडीमशीन विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक!
धीरेनकुमार भोसले
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
- बातमी शेयर करा
माण : जाशी ता.माण येथील गट नं. 436 मध्ये ब्रम्हचैतन्य स्टोन क्रशर चालू असल्याने कायदेशीर परवाना नसताना सदर खडीमशीन चालू करून खडीमशीनच्या आवाजाच्या त्रासामुळे मानसिक संतुलन ढळू लागले आहे.त्या आवाजानी घरात सुसंवाद साधने देखील अवघड झाल्याचे मत जाशीचे स्थानिक नागरिक राजेंद्र दत्तात्रय जगताप यांनी माणच्या तहसीलदार,वनाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
सातारा जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी(महसूल) यांनी दि.25/10/2021 रोजी माण तहसिलदार व उपप्रादेशिक अधिकारी,जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तक्रारदार राजेंद्र जगताप यांनी मौजे जाशी ता. माण येथील गट नं-436 मध्ये रणजित लिंबाजी शिंदे यांचा खडीमशीनचा व्यवसाय चालू असून परिसरातील धुळीमुळे वायूप्रदूषण होणार आहे.यास हरकत असून तो बंद करून दुसऱ्या जागी हलवण्यात यावा.या संदर्भात प्राप्त अहवालामध्ये खडीमशीन मुळे पिकांवर धुळीचा परिणाम होत असून अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील आदेश होण्यास विनंती आहे,असा अहवाल सादर केलेला आहे. मौजे जाशी ता.माण येथील गट नं.436 मध्ये रणजित लिंबाजी शिंदे यांना या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिलेला नसताना त्या ठिकाणी उत्खनन कोणाच्या अधिकाराने होत आहे.याबाबत माण तहसीलदारांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.तसेच क्रशर व्यवसाय हा औद्योगिक बिनशेती घेतलेला आहे किंवा कसे याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
धुळांचे प्रदूषणाबाबत उपप्रादेशिक अधिकारी,जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा यांनी नियमानुसार कार्यवाही करावी असा आदेश देऊनही प्रशासनाने कारवाई केली नसल्याचा आरोप श्री.जगताप यांनी केला आहे.
प्रसंगी नाईलाजास्तव तहसीलदार वनाधिकारी यांना दि.15/02/2024 रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,मौजे जाशी येथे अनेक वर्षापासून शांततामय वहिवाटीने गट नं. 436 मध्ये शेती करत आहेत. माझे सदरील शेतामध्ये अनेक प्रकारे पिके आहेत.सदर मिळकतीशी इतर कोणाचाही संबंध नाही.मी माझ्या मालकीच्या सदरील वहिवाटीत आहे.सदरील रणजित लिंबाजी शिंदे यांनी विनापरवाना बेकायदेशीरपणे खडीमशीन चालू केलेली आहे.खडीमशीनचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना ती चालू करून खडीमशीन च्या आवाजाच्या त्रासामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाचे मानसिक संतुलन ढळू लागले आहे. त्या आवाजाने घरात सुसंवाद साधने अवघड झाले आहे.त्यासोबतच घराच्या काही फुटाच्या अंतरावर खडीमशीन असल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर व्यक्तीकडून माझ्या व माझ्या घरातील लोकांना सतत छळ सहन करावा लागत असून अनेक वेळा त्याचे खडीमशीन बंद करण्यास विनंती केली असता मला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याने माझ्यासह माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे.
हा सर्व प्रकार बघता तहसिलदार व वनअधिकारी माण याकडे किती गांभीर्याने घेणार व काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
संबंधित बातम्या
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 16th Feb 2024 03:14 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 16th Feb 2024 03:14 pm












