कराड तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करा या मागणीसाठी ‘जिल्हा विश्व इंडियन’ च्या सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण

 कराड : कराड तालुक्यात होणाऱ्या बेकायदेशीर गौणखनिज उत्खननास शासकीय वरदहस्त असून, याप्रकरणी कराडच्या तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा विश्व इंडियन पार्टीच्या सदस्य व कराड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. त्यांनी थेट सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन उपोषण करत आंदोलनास सुरुवात केली.

यावेळी जिल्हा विश्व इंडियन पार्टीचे सदस्य काकासाहेब चव्हाण, संजय चव्हाण, अमृत जाधव, बापूसाहेब लांडगे, विलास नलावडे, मयूर लोंढे, राजेंद्र ताटे, निवास माने, सागर पवार यांनी सहभाग घेतला. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, कराडच्या तहसीलदारांची विविध कारणास्तव चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

कराड तालुक्यात गौणखनिजाचे बेसुमार उत्खनन होत आहे, तसेच येथील वडार समाजाला त्यांच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. विंग येथे शासन परवानगी नसताना गौणखनिजाचे उत्खनन झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता उत्खनन केल्याप्रकरणी संबंधितांचा परवाना रद्द करावा, तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयांतर्गत बहुतांशी मंडल अधिकारी, तलाठी तून यांच्या बदल्या होऊ न देणे, तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही बंद असणे, चे अशा विविध त्रुटींमुळे तहसीलदारांचा ही कारभार चर्चेत राहिला होता. या गी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर च कारवाई करावी, अशी मागणी विश्व इंडियन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त