साताऱ्यातील भीषण स्फोटाचे कनेक्शन आता सोलापूर पर्यंत

सातारा : साताऱ्यातील चिकन सेंटर मध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाची लिंक आता सोलापुर पर्यंत पोचली असून तेथील दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे . दरम्यान आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक झाली असून याची आणखी व्याप्ती वाढणार असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.

 शोहेब आली मनियार वय 32 अकीब हमीद पिंजारी [ 32 दोघे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर ]अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

 सातारा शहरात बुधवारी दुपारच्या दरम्यान भीषण स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे गंभीर जखमी झाले होते. हा स्फोट फटाके बनवत असताना झाल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर फटाके बनवणाऱ्या कडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. हा स्फोट झाल्यानंतर सुमारे तीन किलोमीटर परिसर अक्षरशः हातरून गेला होता. त्यामुळे फटाके स्फोटामध्ये नेमके कोणते घटक होते असा सवाल उपस्थित झाला आहे. पोलिसांनी सुरुवातीला साताऱ्यातील दोघांना अटक केली दोघा संशयताकडे कसून तपास सुरू असताना त्यांच्याकडून बार्शी येथील लिंक समोर आली. 

 सातारा शहर पोलिसांनी बार्शीत जाऊन दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता यातील एकाकडे फटाके विक्रीचा परवाना आहे. मात्र दुसरा चालक आहे या दोघांनी मिळून साताऱ्यात झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुजमीन यास फटाके बनवण्याची शोभेची दारू दिल्याची समोर येत आहे. या तिघांमध्ये बँक व्यवहार देखील झाले आहेत. आतापर्यंत चौघांना या प्रकरणात अटक झाली असून जोपर्यंत संपूर्ण धागेदोरे मिळत नाहीत तोपर्यंत पोलिसांचे धाडसत्र असेच सुरू राहणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला