सातारा लोकसभेच्या खासदारकीसाठी शिंदे गटाची ही मोर्चा बांधणी ?
Satara News Team
- Mon 5th Jun 2023 11:03 am
- बातमी शेयर करा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडत असतात. अलीकडच्या काळामध्ये ही प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा सातारा जिल्हा केंद्रबिंदू ठरू लागलेला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व शिवसेनेची फराकत घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय दबदबा निर्माण झाला आहे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिंदे गटाकडून लढवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अधिकृत अद्यापही कोणी मागणी केली नसली तरी चार ते पाच सक्षम उमेदवार शिंदे गटाकडे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूणच राजकीय परिस्थिती पाहता व्यक्ती भोवती राजकारण फिरवले जाते. याला राजकारणा सोबत अर्थकारण असल्याचे लपून राहिलेले नाही. हे त्रिवार सत्य आहे.
२०१९ साली १८ लाख३८ हजार९८७ मतदारांपैकी ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदान केले होते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. श्रीनिवास पाटील हे ८७ हजार ७१७ मताधिक्याने निवडून आले होते. सिक्कीमचे राज्यपाल असताना त्यांनी सातारा जिल्ह्यातील लोकांना दिलेला मान सन्मान व कोणतेही वादग्रस्त गोष्टीवर न बोलणे. तसेच राजकीय दृष्ट्या सर्वसमावेशक कार्यकर्त्यांचे काम करणे. ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. या उलट खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचा व्यक्तिगत करिष्मा खूप मोठा असला तरी त्याचे रूपांतर मतपेटीत अथवा मतदान केंद्रावर होत नाही. याला सर्वस्वी जबाबदार हे स्वतःच्या स्वार्थासाठी श्री चे उदयनराजे भोसले यांचे समर्थन करणारेच काही कार्यकर्ते आहेत. हे सुद्धा लपून राहिलेले नाही. कारण, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले सुनिल काटकर, सिताराम भोसले, डॉ महेश गुरव, संग्राम बर्गे, काका धुमाळ, रविंद्र साळुंखे, सुहास राजे शिर्के, वसंत लेवे, मनोज शेंडे, सौ रंजना रावत, अर्चना देशमुख, संदीप शिंदे, बाळासाहेब ननावरे, नासीर शेख, सन्नी भोसले, बाळासाहेब चोरगे अशा शेकडो काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते सक्षमरित्या सामान्य माणसांना मदत करतात.यातील कार्यकर्ते नावाला उदयनराजेंचे कार्यकर्ते आहेत त्यांना उदयनराजे जिंकू किंवा पडू काही फरक पडत नाही फक्त आपली खळगी भरण्यात ते व्यस्त आहेत यातील बऱ्याच कार्यकर्त्यांची संपत्ती तपासा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळे खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या भोवती नेहमी कार्यकर्त्यांचा व मतदारांचा गराडा असतो.इतर कार्यकर्त्याच्या बाबतीत फारसे चांगले बोलले जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच फटका २०१९साली बसला होता तसं पाहता उदयनराजेंचे मताधिक्य दोन वेळा खासदार असूनही घटले होते . लोकसभा निवडणुकी नंतर चार महिन्यातच त्यांनी भाजप कडून पोट निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
आता लोकसभा निवडणुकीच्या साठी दीड वर्षाचा कालावधी उरला असताना पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व भारतीय जनता पक्ष ,शिवसेना यांच्याकडून उमेदवाराची चाचपणी सुरू झालेली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी चुरस निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यावेळी होणाऱ्या राजकीय घडामोडी मधूनच काही दिशा स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे. त्यांनी आपला महाराष्ट्रात दबदबा निर्माण केला आहे. तशा पद्धतीने लोकसभा साठी सुद्धा किमान त्यांच्या विचाराचे दहा खासदार निवडून जावेत. अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. ठाणे जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही त्यांच्या समर्थकांची संख्या वाढू लागलेली आहे. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचे बंधूंनी ऋषिकांत शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करून आपली पुढील दिशा निश्चित केलेली आहे. त्यामुळे भविष्यात सातारा लोकसभा मतदारसंघाचे चित्र बदलले तर आश्चर्य वाटणार नाही.
व सध्या तरी शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार म्हणून पुरुषोत्तम जाधव कोरेगावचे आमदार महेश शिंदे व पाटणचे सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यापैकी कुणाची नेमकी वर्णी लागेल का आणखीन नवीन उमेदवार लाभेल??? हे आता सांगणे कठीण आहे. राजकीय दृष्ट्या पाहता सातारा- जावली, खंडाळा- वाई- महाबळेश्वर, कराड दक्षिण, उत्तर, माण खटाव, कोरेगाव पाटण या मतदारसंघांमध्ये भाजप- शिंदे गट, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस यांचे प्राबल्य आहे . माण- खटाव व फलटण मतदारसंघ हा माढा मतदारसंघाला जोडला गेल्यामुळे या ठिकाणी मोठी जबाबदारी भाजप व शिंदे गटावर आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराचा खासदार व्हावा यासाठी मोर्चा बांधणी केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचा सातारा जिल्ह्यातील दौरे वाढू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी चाचणी केली असली तरी भाजपकडून सक्षम उमेदवार देण्यासाठी डॉक्टर अतुल भोसले व नरेंद्र पाटील, खासदार श्री छ उदयनराजे भोसले चे नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा खासदार श्रीनिवास पाटील यांचेच नाव पुढे आलेले आहे. शिंदे गटाकडून एकूण पाच नावे घेतली जात आहेत त्यापैकी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पाटणचे आमदार शंभूराजे देसाई कोरेगावचे आमदार महेश शिंदे व खासदारकीची निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेले पुरुषोत्तम जाधव यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजून लोकसभा निवडणुका लागलेल्या नाही तोपर्यंत राजकीय पक्षांनी अंदाज व्यक्त करण्याऐवजी लोकांच्या मध्ये जाऊन चाचणी करावी हे मात्र खरे ठरणार आहे.
फोटो - सातारा लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून चर्चेत असलेली दोन नावे (छाया - अजित जगताप, सातारा)
#satara
#shreenivaspatil
#shamburajdesai
#purshotamjadhav
#udaynrajebhosle
#ramraje
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Mon 5th Jun 2023 11:03 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Mon 5th Jun 2023 11:03 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Mon 5th Jun 2023 11:03 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Mon 5th Jun 2023 11:03 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 5th Jun 2023 11:03 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Mon 5th Jun 2023 11:03 am
संबंधित बातम्या
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Mon 5th Jun 2023 11:03 am
-
दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी जाहीर;जाधव,पवार यांना संधी
- Mon 5th Jun 2023 11:03 am