प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू: मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे

अखिल सातारा शिक्षक संघास दिली ग्वाही

सातारा:  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती संघाचे नेते दीपक भुजबळ यांनी दिली.

ना.  एकनाथ शिंदे महाबळेश्वर दौर्‍यावर आले असताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात संघाचे राज्य उपसरचिटणीस दीपक भुजबळ, राज्य संघटक रजनी चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, सरचिटणीस अजित राक्षे, कार्याध्यक्ष गणेश जाधव, खजिनदार विजयकुमार भुजबळ, प्रसिद्धीप्रमुख उद्धव पवार, उपसरचिटणीस बसवराज दोडमनी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णत हिरवळे, जावळी तालुकाध्यक्ष संतोष लोहार, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र बोबडे उपस्थित होते.

नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या त्वरित करण्यात याव्यात, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी, एमएससीआयटी फाईल निकाली काढून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, एक जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची वेतनश्रेणी त्रुटी दूर करावी, प्राथमिक विभागामध्ये अनेक पदे रिक्त असून त्या पदांची त्वरित भरती करावी, सर्व प्राथमिक शिक्षकांना इतर विभागाप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा मूळ नेमणूक म्हणून धरण्यात यावी, वर्ग शिक्षकाचा शाळेत फोटो लावावा हा निर्णय रद्द व्हावा, अशैक्षणिक कामे रद्द करून वेगवेगळे उपक्रम रद्द करून आम्हाला शिकवू द्या या मागण्यांबाबत यावेळी ना. शिंदे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. दीपक भुजबळ व संजीवन जगदाळे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे ना. शिंदे यांचे लक्ष वेधले. प्राथमिक शिक्षकांवर कोठेही अन्याय होणार नाही. मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन यावेळी ना. शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.

महाबळेश्वर- मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना दीपक भुजबळ, संजीवन जगदाळे, रजनी चव्हाण व इतर.
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त