महाबळेश्वर रस्त्यालगतची केबल खोदाईत झाडे असुरक्षित

सातारा उपवनररंक्षक यांच्या चौकशीचे मुख्य सचिव यांचे आदेश

पाचगणी : केळघर घाटातील काळाकडा ते महाबळेश्वर पर्यत पुण्याच्या टेलिसॅानीक कपंनीने केलेल्या केबल खोदाईमुळे महाबळेश्वरमधील रस्त्यालगतची झाडे केबल खोदाईमुळे झांडाच्या मुळापर्यत गेल्यामुळे महाबळेश्वर शहरातील झाडे असुरक्षित झाली असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरण प्रेमीनकडुन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती . पर्यावरण प्रेमीच्या केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्र्याकडुन घेण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उपवनरसंरक्षक आदीती भारद्वाज यांच्या चौकशीचे आदेश महसुल व वन विभागाच्या सचिवांना दिले आहेत. 

 केळघर घाटातील काळाकडा ते महाबळेश्वर पर्यत पुण्याच्या टेलीसॅानीक कपंनीकडुन केबल खोदाईचे काम करण्यात आले आहे . पंरतु मिळालेल्या परवानगी नुसार काम झाले नसल्यामुळे व रस्त्यालगतच्या झाडाच्या मुळावर खोदांई केल्यामुळे झाडे असुरक्षित झाले असल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्यवरणप्रेमीनी केली आहे . पर्यावरण प्रेमीनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे महाबळेश्वर वन हद्दीमध्ये टेलीसोनीक नेटवर्क कपंनीकडुन केबल खोदाई करीता देण्यात आलेली परवानगी उपवनसंरक्षक सातारा श्रीमती भारद्वाज व वनक्षेत्रापाल महाबळेश्वर गणेश महागडे यांच्या अभिप्राय पत्रानुसार मुख्यवनसंरक्षक कोल्हापुर यांनी दिली आहे .  मौजे माचुतर , मौजे मुकवले ,मौजे शिंदोळा या गावाच्या हद्दीमध्ये केलेली खोदाईचा रिपोर्टसादर केला आहे . सातारा उपनवरंक्षक श्रीमती भारद्वाज यांना वेळोवेळी झाडांच्या असुक्षतितेबाबत पर्यावरण प्रेमी केलेल्या सुचनेच कोणतीही दखल भारद्वाज यांनी घेतली नाही . महाबळेश्वर वनक्षेत्रपाल महागंडे याच्या हद्दीमध्ये टेलीसॅानीक नेटवर्क कपंनीने केलेल्या केबल खोदाईमुळे रस्त्यालगत असलेली झांडाच्या मुळानवर खोदाई करुन केबल टाकल्यामुळे महाबळेश्वर मधील वनसंपदा व वृक्ष् असुरक्षित झाली आहेत . उपवनसरक्षक सातारा पत्रानुसार मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक ) कोल्हापुर  यांनी दिलेली परवानगीत उपवनरक्षक श्रीमती भारद्वाज यांनी टेलीसॅानीक कपनीला दिलेली परवनागी गैरजवाबदार आहे . महाबळेश्वर वनक्षेत्रपाल यांच्या हद्गीतील झाडे असुरक्षित करुन केबल खोदाई केली आहे . वनक्षेत्रपाल महाबळेश्वर गणेश महागडे याला वेळोवेळी पर्यावरण प्रेमीनी मोबाईलवरुन फोन करुन याची सुचना दिली होती . तसेच सातारा उपवनसंरक्षक यांनाही सुचना देवुन केबल खोदाईमुळे झाडाच्या मुळानवर घाव पडले असुन केबल खोदाईमुळे झांडाच्या मुळाजवळील माती भुसभुशीत होवुन झाडे असुरक्षित झाली आहेत . टेलीसॅानीक कपनीकडुन पर्यावरणावर घाला घालणा-या टेलीसॅानीक कपनीला मदत करणा-या उपवनरक्षक श्रीमती भारद्वाज व वनक्षेत्रपाल महाबळेश्वर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त