पाटण तालुक्यात दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन ?
Satara News Team
- Fri 9th Aug 2024 11:23 am
- बातमी शेयर करा
पाटण : पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असलेल्या आणि नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यातील वाल्मीक रस्त्यावर धजगांव (धडामवाडी) येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे.
मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ करीत होते. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली आहे. वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पाटण वनपरिक्षेत्राअंतर्गत असलेल्या वाल्मीक रस्त्यावर लोकांना वाघाचे दर्शन झाले. तेथील गणेश भालेकर यांनी त्याचा व्हिडिओ काढला. तोपर्यंत वाघाने नजीकच्या रानात धूम ठोकली. वाघाचे जवळून दर्शन झाल्याची घटना घडल्याने येथील शेतकरी घाबरले आहेत. धजगांव गावची लोकसंख्या ४०२ च्या आसपास असून वाल्मीक डोंगर पठारावर हे गाव वसले आहे.
बुधवारी रात्री शिंदेवाडी धजगांव रस्त्यावरील झुडपात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. एका बाजूला वाघ आणि दुसऱ्या बाजूला बिबट्या असल्याने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तीन गायी, एक वासरू तर कुणाच्या शेळ्या या वाघाच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
स्थानिक बातम्या
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 9th Aug 2024 11:23 am
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Fri 9th Aug 2024 11:23 am
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Fri 9th Aug 2024 11:23 am
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Fri 9th Aug 2024 11:23 am
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 9th Aug 2024 11:23 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Fri 9th Aug 2024 11:23 am
संबंधित बातम्या
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 9th Aug 2024 11:23 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 9th Aug 2024 11:23 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 9th Aug 2024 11:23 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 9th Aug 2024 11:23 am












