महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी लासुरने येथे केले सहकुटुंब मतदान

कोरेगाव  :  महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रात मतदान केलं. पत्नी वैशाली, मुले तेजस आणि साहिल शिंदे यांच्या समवेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं. पत्नी वैशाली यांनी त्यांचं औक्षण केलं.

त्यानंतर कुटुंबासोबत त्यांनी मतदान केलं. मी लोकशाहीच्या मंदिरात जावून मतदान केलं आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार पार पाडून लोकशाही मजबूत करावी, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सरासरी १८ टक्के मतदान झालं आहे. यामध्ये मतदानाचा सर्वाधिक टक्का दुर्गम आणि डोंगरी असलेल्या पाटण तालुक्यात दिसून आला. विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी पाहता सर्वच ठिकाणी १८  टक्क्याहून अधिक मतदान झाल्याचं दिसतं आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त