सातारा जिल्हा गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराबद्दल सत्कार
Satara News Team
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक या संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ट बैंक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचा सत्कार सातारा जिल्हा गटसचिव संघटनेच्या वतीने करणेत आला. यावेळी सातारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, जिल्हा केडर कार्यालय अधीक्षक मकरंद भोसले, उपाध्यक्ष गोपाळ बेलोशे, केडर प्रतिनिधी कल्याण भोसले, सरचिटणीस दिपक कचरे, चेअरमन सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्था दादासाहेब माने, धनाजी शिंदे, विकास भोसले, विकास गायकवाड, रामदास पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने शेतकरी बांधव केंद्रस्थानी ठेवून विविध कर्जयोजना विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. यामध्ये सेवा सोसायट्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या गटसचिवांचे योगदान मोलाचे आहे. जिल्हा केडर व जिल्हास्तरीय सचिव एकत्रित करण्यासाठी शासनस्तरावर बँकेचे प्रयत्न असून लवकरच एक नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम म्हणाले, सातारा जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी व सेवा सोसायटीच्या बाबतीत जे धोरण राबविले जाईल त्याला जिल्ह्यातील सर्व गटसचिव प्रभावीपणे व ठाम बँकेच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणार असल्याची ग्वाही दिली. जिल्हा केडर व जिल्हास्तरीय सचिवांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Thu 5th Dec 2024 02:07 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Thu 5th Dec 2024 02:07 pm












