भुईंज पोलीसांनी पकडला दुचाकी चोर

वाई : भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे देगाव ता. वाई येथील प्रताप रामचंद्र पंडीत यांची राहत्या घरासमोरून त्यांच्या मालकीची हिरो होंडा स्पेल्डर दुचाकी पंधरा दिवसापुर्वी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्यावरून भुईंज पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात विरोधात चोरीचा गुन्हा दाखल त्यांनी केला होता.
   दरम्यान भुईंज पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सपोनि रमेश गर्जे यांनी पदभार स्विकारल्यानंतर या फिर्यादीची दखल घेत एक तपास पथक तयार केले व देगाव येथील सीसीटिव्ही व अन्य चौकशीतून देगाव येथील संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री चोरट्यास ताब्यात घेवून अटक केली व त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली. पोलीसांच्या या अॅक्शन मोडमधील कारवाईमुळे देगाव सह परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
   यात संशयित म्हणून अमोल मोहन जाधव वय २५ वर्षे रा. देगाव ता. वाई याला अटक केली असून पुढील तपास सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एम.रलदिप भंडारे, पोलीस हवालदार बापूसाहेब धायगुडे, सागर मोहिते, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ आदी करीत आहेत.
   दरम्यान नवनिर्वाचित सपोनि रमेश गर्जे यांनी कार्यक्षेत्रातील चोरी आणि लुटमारीतील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले असून त्यांच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी कौतुक केले आहे.

 

शनिवार रविवारच्या महामार्गावरील वाहतुक बाबत ठोस निर्णय घेणार सपोनि रमेश गर्जे
  सध्या महामार्गावर शनिवारी व रविवारी विकएंड मुळे पर्यटक वाहनांची खंबाटकी बोगदा व आनेवाडी टोलनाका, सुरूर उड्डाण पुल येथे होणारी गर्दी व खोळंबणारी वाहतुक यावर ठोस निर्णय घेवून लवकर अंमलबजावणी होईल अशी चर्चा यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त