लाचखोरीने पुंन्हा 'महसूल'डागळला...! महसूलमधिल तलाठीच लाचखोरीत अव्वल

महसूल खात्यावर नामुष्की.

देशमुखनगर  : गावकामगार तलाठी ईनामापेक्षा पैशाला सोकावलेल्या प्रवृत्तीमुळे महसूल खात्याला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन वर्षात काही तलाठी बडतर्फ झाले, काहींचे निलंबन तर बऱ्याच जणांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असतानाही लाचखोरीची प्रवृत्ती बळावत आहे. तलाठी लाचखोर ठरू लागल्याने महसूलच्या विश्वासहार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. झारीतील शुक्राचार्यच्या स्वार्थापोटी महसूल ला लागणारा डाग यंत्रणेला मारक ठरू लागला आहे.
    जमिनीची खातेफोड नोंद करून सातबारा उतारा देण्याकरता लाच स्वरूपात पाच हजार रुपयाची रक्कम स्वीकारणाऱ्या डिस्कळ तालुका खटाव येथील तलाठी जय बर्गे यांना लाच लुचपत प्रतिबंध पथकाने सोमवारी रंगेहात पकडले, तलाठ्याला लाजप्रकरणी अटक झाल्याने महसूल खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत, अलीकडच्या काळात महसूल खात्यातील लाचखोरीच्या  वाढत्या घटना मुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मानहानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे लाचखोरीचे प्रकार तलाठी कार्यालय परिसरात घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला  आहे. सातबारा देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याने महसूल खात्याची पूर्ती मानहानी होत आहे, महसूल खात्यासह पोलीस आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्था विभागाअंतर्गत लाचखोरीच्या घटना समाजातील सर्वच घटकांच्या मुळावर उठल्या आहेत. महागाई, बेकारीसह कोरोनाच्या काळात होरपळून निघालेल्यानांही  आयुष्यातून उठवणाऱ्या आहेत. आर्थिक उलाढाली ठंडावलेल्या असतानाही गरजूंना खिंडीत गाठून त्यांच्याकडे लाच स्वरूपात लाखोंची मागणी करणे आश्चर्यजनक ठरत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला