तो फोन मी नव्हे तर खा.उदयनराजेंनीच कट केला. मंत्री शंभूराज देसाई

सातारा : खा. उदयनराजे भोसले यांच्याशी फोन सुरू असतानाच आमच्या निवासस्थानी आमदार शिवेंद्रराजे दाखल झाले. मी त्यांचे स्वागत केले आणि उदयनराजेंना म्हटले, एका बाजूला थोरल्या राजांचा फोन सुरू आहे आणि धाकटे राजे मला भेटायला आले आहेत, असे मी म्हटले. तेवढ्यात तिकडून फोन कट झाला. मी नव्हे तर उदयनराजेंनी फोन कट केला, असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर पत्रकारांशी संवाद साधला. खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक पालकमंत्र्यांकडे मजूर फेडरेशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी उदयनराजेंशी पालकमंत्री फोनवरून बोलत होते. त्याच वेळी आ. शिवेंद्रराजे भोसले तेथे आल्याने फोन कट झाला. हा फोन कोणी कट केला, याविषयी मंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, शुक्रवारी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे माझी वेळ घेऊन निवासस्थानी आले.

त्याच काळात राजे येण्यापूर्वी उदयनराजे यांचे कार्यकर्ते सुनील काटकर यांनी उदयनराजेंना फोन लावून दिला. माझे बोलणे सुरू होते. त्याचवेळी शिवेंद्रराजे तेथे आले, त्यामुळे मी त्यांचे स्वागत केले आणि उदयनराजेंना म्हटले, एका बाजूला थोरल्या राजांचा फोन सुरू आहे. धाकटे राजे मला भेटायला आले आहेत, असे मी म्हटले तेवढ्यात तिकडून फोन कट झाला. मी फोन कट केला नाही, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त