साताऱ्यातील कमानी हौद परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास फायरिंग. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

सातारा: सातारा शहरातील कमानी हौद या परिसरात काल मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेतील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतली आहेत. या फायरिंग मध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की सातारा शहरातील कमानी हौद येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीवर संशयित आरोपीने फायरिंग केल्याची घटना घडली रस्त्यावर आडवी लावलेली दुचाकी बाजूला घे म्हटल्याचे कारणातून मारहाण व नंतर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली या प्रकरणी धीरजा ढाणे. हर्षद शेख राहणार गुरुवार पेठ सातारा व अनोळखी चौघे यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यामध्ये विशाल वायदंडे राहणार शनिवार पेठ व त्याचा मित्र जखमी झाल्याची पोलिसांनी सांगितले. या घटनेमध्ये चार राऊंड फायरिंग झाल्याची स्थानिकांनी सांगितले परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी एकच बुलेट पोलिसांना आढळून आली आहे.

 

कमानी हौद परिसरामध्ये फायरिंग ची घटना घडल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयतांना ताब्यात घेतले या फायरिंग मध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी कमानी हौद परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला