विसापूर दुहेरी हत्याकांडाचे गूढ कायम; घटनास्थळी ना हत्यार ना ठसेे

Mystery of Visapur double murder remains; No weapons were found at the scene
निकम यांच्या घरातील साहित्यही अस्ताव्यस्त झाले नव्हते. त्यामुळे अज्ञात मारेकर्‍यांबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. त्यातच घटनेची माहिती मिळण्यासाठी वेळ लागल्याने आणि गुन्ह्याची उकल होण्याच्या दिशेने कोणतेही कारण व महिती सामोर येत नसल्याने अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

खटाव :  विसापूर (ता. खटाव) येथील हणमंत भाऊ निकम (वय 68) आणि कमल हणमंत निकम (65) या वृद्ध दाम्पत्याचा खून झाला असल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली.ही घटना उघडकीस येण्याच्या अगोदर एक दिवस त्यांचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तत्परता दाखवत पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास देखील सुरू केला मात्र घटनास्थळावर पोलिसांना कोणतेही हत्यार किंवा संशयित मारेकर्‍यांच्या हातांचे ठसे मिळाले नाहीत.  मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत मात्र इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूंना हात न लावण्यात आल्याने या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक झाला आहे. रविवारी पहाटे पावणेतीन वाजता अज्ञाताविरोधात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.हणमंत निकम यांच्या शेजारी रहाणार्‍या अर्चना शिंदे यांनी कमल निकम यांच्याकडे दहा दिवसांपूर्वी ब्लाऊज शिवायला दिले होते. दि. 8 रोजी कमल निकम यांनी अर्चना यांना घरी बोलावून शिवलेला ब्लाऊज दिला होता. त्यावेळी त्यांनी घरगुती गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर नळाला पाणी आल्याचे अर्चना यांनी निकम दाम्पत्याला सांगितले. हणमंत निकम यांनी पाणीही भरले होते. दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी येत राहिल्याने निकम यांच्या घराकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. शनिवारी संध्याकाळी शेजारील उषा सावंत यांनी अर्चना यांना हाक मारुन सकाळपासून निकम दांपत्याच्या घराच्या दोन्ही खोल्यांच्या दरवाज्यांना बाहेरुन कडी असल्याचे आणि लाईटही बंद असल्याचे सांगितले.

अर्चना यांनी कमल निकम यांच्या मोबाईलवर फोन लावला असता त्यांनी तो उचलला नाही. त्यानंतर निकम यांच्या स्नुषा विशाखा यांनाही फोन करुन चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनी त्यांचाही फोन सासू-सासर्‍यांनी उचलला नाही, तुम्हीच घरी जाऊन बघा असे अर्चना यांना सांगितले. शेजार्‍यांनी निकम यांच्या घराच्या दोन्ही खोल्यांच्य कड्या उघडल्या तेव्हा पती-पत्नीचे मृतदेह निपचित पडलेले होते. दोघांच्याही मृतदेहाच्या नाका तोंडातून आलेले रक्त सुकून गेले होते. कमल निकम यांच्या गळ्यातील दागिने देखील लंपास झाले होते. हणमंत निकम यांच्या तोंडावर मारहाण झाल्याच्या खुणा प्रत्यक्षदर्शंनी दिसल्या. या घटनेची माहिती पोलिस- पाटील प्रल्हाद सावंत यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळावर पोहचले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.निकम यांच्या घरात गुन्ह्यात वापरण्यात आलेले कोणतेही हत्यार सापडले नाही. तसेच दांपत्याचा राहत्या घरात खून करुन गुन्हेगार घराला बाहेरुन कडी लावून पसार झाला. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांना कोणतेच ठसे मिळाले नाहीत. निकम यांच्या घरातील साहित्यही अस्ताव्यस्त झाले नव्हते. त्यामुळे अज्ञात मारेकर्‍यांबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. त्यातच घटनेची माहिती मिळण्यासाठी वेळ लागल्याने आणि गुन्ह्याची उकल होण्याच्या दिशेने कोणतेही कारण व महिती सामोर येत नसल्याने अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

 शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला