खा.उदयनराजे भोसले यांनी दिल्या मंत्री शंभूराज देसाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सातारा : महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री शंभूराज देसाई यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 
   खासदार उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांची मैत्री जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला सर्वश्रुत आहे. दोघेही राजकारणात वेगवेगळ्या पक्षात सक्रिय असले तरी त्यांचे ऋणानुबंध जपले आहेत. देसाई कुटुंबाचे राजघराण्याशी असलेले मैत्री संबंध उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांचे भेटीतून अनेकदा समोर आले आहेत. राजकारणात मंत्री पदी असलेले शंभूराज देसाई राजघराण्याप्रती असलेली निष्ठा जपत उदयनराजेंना देत असलेल्या सन्मानाने शंभूराजेंच्या साधेपणानाचा अनुभव येतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 
आज सकाळीच खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त