9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे उत्तमरित्या नियोजन करा - मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा
Satara News Team
- Mon 8th Aug 2022 09:43 am
- बातमी शेयर करा
सातारा : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागात 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उत्तमरित्या नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. गौडा बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, मनोज जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी झेंडे उपलब्ध झाले आहेत. त्याचे वितरण तालुक्यांना लवकरच करण्यात येईल. शासकीय कार्यालयांबरोबरच शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत फडकेल याबाबत नियोजन करा.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. याची नागरिकांमध्ये मोठी जनजागृती करा. शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करा. त्याचबरोबर प्रभात फेरी, वृक्षारोपण, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता सुशोभीकरण यासह अनेक विविध उपक्रम राबवा, असेही निर्देश श्री. गौडा यांनी दिले.यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती देशमुख म्हणाल्या, शासकीय इमारतींबरोबर सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे लोगो लावावेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रमांचे नियोजन करावे. ज्या गावांमध्ये सैनिकांची संख्या जास्त आहे, अशा गावांमध्ये सैनिक कल्याण कार्यालयाच्या मदतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे सांगून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत प्रत्येक तालुक्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
#satarazilhaparishad
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 8th Aug 2022 09:43 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 8th Aug 2022 09:43 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 8th Aug 2022 09:43 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 8th Aug 2022 09:43 am
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 8th Aug 2022 09:43 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Mon 8th Aug 2022 09:43 am













