सातारा झेडपीच्या ई-ऑफिस प्रणालीचा राज्यात डंका

सातारा :  सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवत देशभरात नावलाैकिक मिळवला आहे. नागरिकांची कामे गतीने व्हावीत, त्यामध्ये पारदर्शकता असावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज सुरू केल्याने सर्वच विभागांतील कामांचा वेळेत निपटारा होण्यास मदत झाली आहे.

सातारा जिल्हा परिषदेने ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात सातारा जिल्हा परिषदेने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी पावले उचलली. याशनी नागराजन यांच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपासून कार्यालयातील सर्व कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू केले.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले गेले. ही प्रणाली कार्यान्वित झाल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे बघता येत असल्याने एकप्रकारे कामकाजात गतीमानता येत आहे.

संगणकांचा जास्तीत जास्त वापर करुन शासकीय काम गमिमान व्हावे, कामकाजात सुसुत्रता यावी, दस्तएवज व माहिती सुरक्षित राहावी, निर्णय प्रक्रिय गतिमान व सुलभ व्हावी यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याच्या शासनाच्या सुचना होत्या.

त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करुन या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून ई- ऑफिस प्रणालीतील उल्लेखनीय कामकाजाबद्दल मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना अभिनंदनपर पत्र दिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त