एकट्या सातारा तालुक्यात डेंग्यूचे 68 तर जिल्ह्यात 106 रुग्ण
प्रकाश शिंदे - Sun 7th Aug 2022 05:31 am
- बातमी शेयर करा
सातारा तालुक्यात डेंग्युचे सर्वाधिक रुग्ण सध्या जावली तालुक्यात 1, कराड 12, खंडाळा 1, खटाव 9, कोरेगाव 11, पाटण 1, सातारा 68, वाई 2, असे एकूण 106 डेग्यूचे रुग्ण आहेत. तर चिकुनगुनियाचे खटाव तालुक्यात 12, माण 6, कुडाळ 5, राजाळे 4, पुसेगाव 2 असे 29 रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण जिल्ह्यात आढळले असल्याने आरोग्य विभागामार्फत योग्य उपाययोजना राबवण्यावर भर दिला आहे.
सातारा : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे सातारा जिल्ह्यात किटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकुनगुनियाचे रूग्ण वाढू लागले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूचे 106 तर चिकुनगुनियाचे 29 रूग्ण सापडले असून जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यातच गेल्या 8 दिवसांपासून डेंग्यू व हिवताप संशयित रूग्णांचे नमुने तपासणीविना पडून आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे किटकजन्य आजारांचा फैलाव वाढू लागला आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर आजारांनी डोके वर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूचेही 8 रूग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. त्यातच डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण ठिकठिकाणी सापडू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.
सर्व कार्यक्षेत्रात आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. घरात किंवा घराच्या टेरेसवर सामान उघड्यावर फेकू नये, पाणी साठवलेल्या भांड्यांचे झाकण घट्ट बसवावे. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत मार्फत त्वररित धूर फवारणी करण्यात यावी. प्रशासनामार्फत सार्वजनिक ठिकाणच्या भंगार व अन्य साहित्यांची विल्हेवाट लावावी. ज्या ठिकाणी भंगार साहित्य आढळल्यास अशा घरमालकांना तात्काळ नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान, डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रुग्णांचे नमुने गेल्या 8 दिवसांपासून प्रयोगशाळेत तपासणीविना प्रलंबित आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ लक्ष देवून कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
chikanguniya
civel
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 7th Aug 2022 05:31 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 7th Aug 2022 05:31 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 7th Aug 2022 05:31 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 7th Aug 2022 05:31 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 7th Aug 2022 05:31 am
संबंधित बातम्या
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Sun 7th Aug 2022 05:31 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sun 7th Aug 2022 05:31 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sun 7th Aug 2022 05:31 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 7th Aug 2022 05:31 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sun 7th Aug 2022 05:31 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 7th Aug 2022 05:31 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sun 7th Aug 2022 05:31 am












