येस ग्रुपच्या वतीने शेतकरी सभासदांना मोफत औषध वाटप- येस ग्रुप संस्थापक संजय भगत

 खटाव: येस ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देणे खते औषधे मोफत वाटप अशा विविध उपक्रमांचा मोफत लाभ सभासद शेतकऱ्यांना दिला जातो या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले 
       जाखणगाव ता. खटाव येथे येस ग्रुपच्या करार शेतीतील शेतकऱ्यांना मोफत बीज प्रक्रिया औषध, तणनाशक व स्टिकर याचे वाटप करण्यात आले यावेळी श्री संजय भगत बोलत होते तर शहाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती             

          करार शेती अंतर्गत सोयाबीनला कमीत कमी6000 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल दर व घेवड्याला  7500 ते 8500 रुपये कमीत कमी प्रति क्विंटल दर या हमीभावाच्या करार शेतीस शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून करार शेतीची मुदतवाड करण्यात आली आहे उशिरा आलेला पाऊस  रखडलेल्या पेरण्या यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने करार शेतीचा मुदत वाढीचा निर्णय घेतला याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून हे करार शेतीची योजना फक्त सातारा जिल्ह्यासाठी वाढीव मुदत आहे असेही श्री संजय भगत म्हणाले 

         शेतकऱ्यांना हमीभाव देणे ही अभिनव उपक्रम प्रणाली यशस्वीरित्या येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून राबवली जात असून शेतकऱ्यांना करार शेतीतील रखमा वेळेवर खात्यावर जमा करणे शेतकऱ्यांना मोफत योग्य मार्गदर्शन करणे मोफत खत वाटप औषध वाटप अशा वेगवेगळ्या पातळीवर येस  ग्रुपची करार शेती यशस्वी ठरली आहे असे मत सचिव अरविंद विधाते यांनी व्यक्त केले 
       यावेळी  प्रदीप शिंदे, राहुल शिंदे, पांडुरंग कोळपे, गणेश शिंदे, दत्तात्रय शिंदे, अनिल शिंदे, हनुमंत शिंदे, बाळासो महानवर, दिनेश नेवसे, कामाजी ठोंबरे ,गोरख ठोंबरे आदी लाभार्थी सभासद शेतकरी उपस्थित होते 


 -  करार शेतीला मुदत वाढीचा निर्णय-
उशिरा होणारा पाऊस व रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सातारा जिल्ह्यातील घेवड व सोयाबीन करार शेतीला मुदत वाढ देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी 8308790475- 8530690475 या नंबर वरती संपर्क करावा असे आवाहन व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त