सातारा न्यूजच्या लढ्याला यश; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कॅफेंमधील गैरप्रकारांना बसणार लगाम

कलम 144 मधील तरतुदी नुसार 12 मे पासून 30जून पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144चे आदेश जारी

सातारा : सातारा शहर आणि उपनगर परिसरात सुरू असलेल्या कॅफेमध्ये अश्लील प्रकार घडत असल्याची बातमी सातारा न्यूजने वारंवार प्रसिद्ध केली होती. तसेच प्रीती हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कॅफेमध्ये काही प्रेमियुगल अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार सातारा न्यूजने उघडकीस आणला होता. या प्रकारानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस प्रशासनाला सूचना देत सदर कॅफे मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते तसेच सदर कॅफे चालवण्याच्या बाबतीत कोणती नियमावली असावी याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. अखेर आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सातारा शहरात घडत असलेल्या कॅफेंमधील गैरप्रकाराबाबत गंभीर दखल घेत कॅफे शॉप संदर्भात नियमावली जाहीर केले आहे.
 सातारा जिल्ह्यातील कॅफे शॉपमध्ये गैरकृत्य टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदी नुसार 12 मे पासून 30जून पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144चे आदेश जारी केले आहेत.
    कॅफे शॉपमधील पुर्ण बैठक व्यवस्था सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे कक्षेत यावी अशी सी.सी.टी.व्ही यंत्रणा बसविणे बंधनकारक असणार आहे. कॅफे शॉप मधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत, दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकाचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत.
कॅफे शॉप मधील सर्व बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी.  कॅफे मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी करण्यासाठी रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पोलीस व्हिजीट बुक नोंदवही ठेवणेत यावी.  कॅफे शॉप मध्ये कोणतेही गैरकृत्य करणेस मनाई असेल. असे गैरकृत्य कॅफे मध्ये होवू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना कॅफे शॉप मालक/चालक यांनी करावी असे या आदेशात नमुद केलं आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढलेल्या या आदेशाचे सातारकरांमधून स्वागत होत असून आता या नियमांची पायमल्ली करणाऱ्या कॅफेंवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला