कराडजवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 5 कोटींची रक्कम लुटली

कराड :  मलकापूरातील ढेबेवाडी फाटा येथे शस्त्रधारी पाच जणांच्या टोळक्याने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. लुटलेली रक्कम हवाला मार्फत मुंबईहून दक्षिण भारतात नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून मोठ्या रकमेची लूट होवूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. फिर्यादीकडेही कसून चौकशी सुरू असून फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुबंईला हवाल्याने पैसे पोचविणाऱ्या कंपनीचा काऱभार दक्षिण भारतात मोठ्या शहरात आहे. संबंधित कंपनीची कार सुमारे पाच कोटींची रक्कम घेऊन सोमवारी रात्री मुंबईहून दक्षिण भारतात पैसे पोच करण्यासाठी निघाली होती. ती कार निघाली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कार कराडमध्ये आली. मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यावर कारला वाहन आडवे मारून ती अडविण्यात आली. 

त्या कारमधून पाच ते सहा जण उतरले. त्यांच्याकडे पिस्तुलांसह धारदार शस्त्रे होती. त्याचा धाक दाखवून त्यांनी कारमधील सुमारे पाच कोटींची रक्कम लंपास केली. ती रक्कम घेवून ते मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची तपासाची सुत्रे हलली आहे. त्यानुसार चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. यातील मुख्य सुत्रधार अद्यापही पोलासांच्या हाती लागलेला नाही. उद्यापर्यंत यातील रक्कम व संशयीत अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 दरम्यान, महामार्गावर झालेल्या मोठ्या लुटीमुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर येथे तळ ठोकून होत्या. पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरिक्षक राम ताशीलदार यांच्यासह डीबी, एलसीबीच्या व पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने तपासाची सुत्रे हलवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असून त्यानुसार आधारावर तपासाला गती दिली आहे. चोरी प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त