फलटण येथील हॉटेल आनंद विलास च्या खाद्यपदार्थात चक्क पालींचा रहिवास?

खाद्यपदार्थामध्ये पालीचे मुंडके ते पोट असे दोन इंचाचे पालीचे साबुत अवशेष सापडल्याने दोघांवर गुन्हा दाखल.

फलटण : फलटण शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस झाला असून एका हॉटेलमध्ये पुरी भाजीच्या भाजीमध्ये चक्क पाल सापडली असल्याचा आरोप साहिल शेख रा. सोनवडी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा यांनी केला आहे.

 याबाबत थोडक्यात माहिती अशी की १४ ऑक्टोंबर सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास फलटण येथील पंचायत समिती समोर असलेले "हॉटेल आनंद विलास" येथे साहिल शेख हे नाश्ता करण्या करिता गेले होते. त्यांनी नाष्टयासाठी पुरी भाजी मागवली. पुरी भाजी खात असताना त्यांना मुंडक्यापासून पोटापर्यंतचा तुटलेला पालीचा भाग सापडला. याबाबत हॉटेल मालक यांस हे निदर्शनास आणून दिल्यानंतर साहिल शेख यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आचाऱ्यासह अन्य एकावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार संतोष कदम फलटण शहर पोलीस ठाणे करीत आहेत.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त