मलकापूरात युवकांमध्ये मारामारीत युवकावर चाकू हल्ला

कराड : युवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना कराड नजीक असलेल्या मलकापूर शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात रविवारी रात्री घडली. यावेळी झालेल्या भांडणात दोन युवकांवर चाकूने वार करण्यात आले. तर एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन कारची काच फोडण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अमीन रसूल शेख (वय २३, रा. मोरया कॉलनी, मलकापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरुन निरंजन दीपक थोरात (रा. लक्ष्मी मंदिराजवळ, मलकापूर) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमीन शेख, सुफियान मोमीन आणि सोहेल मुलाणी हे तिघेजण मित्र आहेत. रविवारी रात्री निरंजनने मारहाण केली असल्याची माहिती सोहेलने अमीन व सुफियान या दोघांना दिली. त्यानंतर अमिन व सुफियान हे दोघेजण निरंजनला याबाबतचा जाब विचारण्यासाठी त्याच्या घराकडे गेले. 

 त्यांनी निरंजनला घरातून बाहेर बोलावून घेतले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी निरंजन याने त्याच्याजवळील चाकूने अमीन आणि सुफियान या दोघांवर हल्ला केला. त्यामध्ये दोघे जखमी झाले. दरम्यान, याउलट निरंजन दीपक थोरात याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन सुफियान रफिक मोमीन (रा. लक्ष्मी मंदिराजवळ, मलकापूर), सोहेल राजुभाई मुलाणी (रा. मोरया कॉलनी, मलकापूर) व अमिन रसुल शेख (रा. शिवाजी चौक, मलकापूर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोहेलसोबत वाद का घातला, असे म्हणून या तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच कारची काच फोडली. असे निरंजन थोरात याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त