कोरेगाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जीवे मारण्याचा प्रयत्न
Satara News Team
- Mon 14th Oct 2024 10:32 am
- बातमी शेयर करा

कोरेगाव : प्रेम प्रकरणाच्या संशयावरून धुमाळवाडी (नांदगिरी) ता. कोरेगाव येथील विशाल चंद्रकांत शिंदे याने आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन निलेश जाधव, रा. जळगाव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव जळगाव रस्त्यावर पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली. कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता विशाल शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश जाधव यांच्या पत्नी पूनम निलेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सुमारास कोरेगाव ते जळगाव रस्त्यावर विशाल चंद्रकांत शिंदे याने निलेश जाधव यांच्यावर नांदगिरीतील आपल्या कुटुंबातील एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण असल्याचा संशय घेतला, त्यानंतर स्वतःच्या ताब्यातील मारुती वॅगनआर कारने निलेश जाधव हे दुचाकीवरून जळगावकडे निघाले असता पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. यामध्ये निलेश जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरेगाव पोलीस ठाण्यात विशाल चंद्रकांत शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने निलेश जाधव यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Mon 14th Oct 2024 10:32 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Mon 14th Oct 2024 10:32 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Mon 14th Oct 2024 10:32 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Mon 14th Oct 2024 10:32 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 14th Oct 2024 10:32 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Mon 14th Oct 2024 10:32 am
संबंधित बातम्या
-
घातपात करण्याचा प्रयत्न होता; एसटी काय तुझ्या गोठ्यात आली होती का?
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी लोकसेवक कि अवैध व्यवसाय सेवक?
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
म्हसवड पोलिसांची अवैध दारुविक्री व दारु वाहतूकीवर कारवाई ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा
- Mon 14th Oct 2024 10:32 am
-
पत्नीचा खून, मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या पतीला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Mon 14th Oct 2024 10:32 am