प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जळगाव खून प्रकरणी संशयिताच्या भाऊ व वहिनीला अटक

कोरेगाव   कोरेगाव जळगाव रस्त्यावर दसऱ्याला अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता रविवारी निलेश शंकर जाधव या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

 दसऱ्या दिवशी संशयित विशाल शिंदे यांनी प्रेम प्रकरणाच्या संशयातून निलेश जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता उपचारात दरम्यान जाधव याचा मृत्यू झाला यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता यावेळी जिल्हा रुग्णालयातील वातावरण तंग झाले होते.

त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी ॲक्शन घेत खुनाचा कटरचने आणि खून केल्याप्रकरणी विशाल शिंदे यांच्या सह त्याचा भाऊ संतोष शिंदे व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला यानंतर संतोष व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल शिंदे हा अजून सुद्धा फरार असून त्याच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त