राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा
रसायनशास्त्र विषयात नोकरीच्या विविध संधींबाबत मार्गदर्शनआशपाक बागवान
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
- बातमी शेयर करा

पुसेसावळी : राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध, ता. खटाव येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्ल चंद राय जयंती व राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत भंडारे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन शिंदे यांनी केले.
संपूर्ण भारतामध्ये दोन ऑगस्ट रोजी भारतीय रसायन शास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्ल चंद राय यांची जयंती राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस म्हणून साजरी केली जाते. रसायनशास्त्रातील योगदान व त्यांच्या कार्याची माहिती प्रा. राजेश खरटमोल यांनी करून दिली. रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेत बी.एससी. व एम.एससी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे नियोजन प्रा. तेजस्विनी जठार यांनी केले होते. या स्पर्धेतील रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक - वेदांतिका घार्गे, व्दितीय क्रमांक - साक्षी सुर्यवंशी, त॒तीय क्रमांक - अमृता पवार, प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक - कोमल पवार, व्दितीय क्रमांक -अमृता पवार, तृतीय क्रमांक - शुभम भोसले, मिळवणाऱ्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे सहसचिव प्रा.संजय निकम म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनात रसायनशास्त्र विषय अतिशय महत्त्वाचा असून विद्यार्थी यामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय उभा करु शकतात. रसायनशास्त्र विषयात विविध नोकरीचे मार्ग असून विद्यार्थ्यांनी या विषयात आपले करिअर उज्वल करावे. असे प्रतिपादन संस्थेचे सहसचिव प्रा.दिपक करपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सोनम घार्गे मॅडम यांनी केले व आभार प्रा.अंजली भोकरे मॅडम यांनी मानले .
स्थानिक बातम्या
राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा.
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
संबंधित बातम्या
-
राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा.
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 4th Aug 2025 04:45 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 4th Aug 2025 04:45 pm