९२ हजार रुपयांची लाच घेताना कार्यकारी अभियंता जाळ्यात

मंजूर बिल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी मागितली लाच बिलावरील 2 टक्के रक्कम

सातारा  : तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बिल मंजुर करुन ते बिल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी 2 टक्के प्रमाणे लाच मागणी करून ती लाच रक्कम स्विकारणाऱया  जिल्हा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियत्याला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सतीश पंचाप्पा लब्बा(वय 48, रा. सदरबझार सातारा) असे त्यांचे नाव आहे.  
अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी बिलाच्या 2 टक्के प्रमाणे 92 हजार रूपये लाच मागितली होती. तक्रारदार याने लाच लुचपत विभागाकडे यांची तक्रार केली. या तक्रारीनुसार लाप्रावि सातारा विभागाचे विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, पोलीस नाईक राजे, काटकर, पोलीस कॉन्टेबल येवले, भोसले यांनी सापळा लावला. मंगळवार दि. 2 रोजी ही लाच स्विकारताना अभियंता सतीश लब्बा रंगेहाथ पकडण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीसांना यश आले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला