शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत शिवविजय २०१९-२० ला १२ पारितोषिके

छत्रपती शिवाजी कॉलेज,विद्यापीठात द्वितीय

सातारा :  शिवाजी विद्यापीठ सलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा -२०१९-२०  निकाल विद्यापीठाने जाहीर केला असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शिवविजय या नियतकालिकातील विद्यार्थ्यांनी साहित्य,कला इत्यादी स्पर्धेत १२ पारितोषिके मिळविली. तसेच मांडणी,रचना, सुंदरता,छपाई इत्यादी निकषावर मूल्यमापन होऊन या शिवविजय अंकाने शिवाजी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला आहे.विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील व कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी  शिवविजय २०२९-२० चे संपादक व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्यांचे प्रतिनिधी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

  शिवाजी विद्यापीठ सलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेतील वैयक्तिक १२ पारितोषिके ज्यांना मिळाली आहेत.त्यात मराठी भाषेमध्ये समीक्षा लेखनप्रकारात पल्लवी वाघमळे हिने लीहिलेल्या आनंदी गोपाळ : एक संघर्ष गाथा या चित्रपट समीक्षेस  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून मिळवले आहे. स्नेहल तानाजी कोळी बी.ए .भाग १ हिने ‘रिमझिम बरसती पाउसधारा ‘या ललित लेखनास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ऋतुजा शांतीलाल पाटील बी.ए .भाग -१   हिने लिहिलेल्या ‘झुंज ‘या कथेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर उर्मिला राजेंद्र ससाणेबी.ए .भाग -३ हिने लिहिलेल्या ‘समाजमाध्यमांचा तरुणावर होणारा परिणाम ‘या संशोधन लेखनास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.उदय नितीन फाळके बी.ए.३  [मराठी ] यांने लिहिलेल्या ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव ‘या व्यक्तीचित्रनास द्वितीय क्रमांक मिळाला .हिंदी भाषेत  आदिती जाधव हिने लिहिलेल्या ‘महाभारत के नायक नायिका कि त्रासदी : भटको नही धनंजय ‘या समीक्षा लेख्ननास प्रथम क्रमांक मिळाला .आशुतोष भोसले व तुषार गायकवाड बी.ए .भाग -१ यांनी लिहिलेल्या रंगकर्मी तुषार भद्रे जी के साथ वार्तालाप ‘या मुलाखतीस दुसरा क्रमांक मिळाला.सानिका बजरंग माळवदकर हिने लिहिलेल्या ‘अबला नही हु मै’ या एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला. इंग्रजी भाषेतील आरजू आलीम तांबोळी हिच्या Decadence of Indian culture या माहितीपर लेखनाचा विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाला .दिलीप कोंडीराम हंकारे याने काढलेल्या व्यंगचित्रास तृतीय तर वैभव शेडगे याने काढलेल्या छायाचित्रास द्वितीय क्रमांक मिळाला .या यशाबद्ल यशस्वी विद्यार्थ्यांचे व संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व संपादक मंडळ यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त