चिमणगाव येथील शेतकऱ्याची नारळाची झाडे पेटवल्याचीतक्रार देऊन सुद्धा बीट अंमलदाराकडून टाळाटाळ

कोरेगाव पोलीस स्टेशन यांचेकडून शेतकऱ्यावर अन्याय

शिवथर : चिमणगाव तालुका कोरेगाव येथील शांताराम विठ्ठल भोसले यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला गेल्या महिन्यामध्ये नारळाची झाडे पेटवल्याची तक्रार दिली होती याबाबत सातारा न्यूज ने बातमी प्रसिद्ध केलेली होती त्यावेळी गाव कामगार तलाठी तसेच वनविभाग आणि कोरेगाव पोलीस स्टेशन यांनी आज अखेर कोणतीही कार्यवाही न करता या शेतकऱ्याला फक्त हेलपाटे मारण्याची वेळ आलेली आहे संबंधित तालुका पोलीस स्टेशन येथील संबंधित हवलदाराचे तक्रारदाराने हात ओले करून सुद्धा यांची आजखेर दखल घेतली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे
        याबाबत कोरेगाव पोलीस स्टेशन येथील संबंधित पोलिसांना विचारणा केली असता आज उद्या ज्यांनी झाडे पेटवली आहेत त्यांना बोलावून घेतो अशीच उत्तरे मिळत आहेत संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत टाळाटाळ केलेली आहे तलाठी यांनी सांगितले की नारळाची झाडे पेटवलेली आहेत याबाबत पंचनामा वनविभाग तालुका पोलीस स्टेशन आणि गाव कामगार तलाठी एकत्रित करून केला जातो आणि याच तलाठ्याने ज्या शेतकऱ्यांची झाडे पेटलेली आहेत त्यांना हे दोघे आल्यानंतर मला बोलवा तोपर्यंत येऊ नका असा सज्जड दम दिल्यासारखाच विषय झालेला आहे
या सर्वसामान्य शेतकऱ्याला एक महिना उलटून देखील न्याय मिळत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा अशी ही सर्वसामान्य जनतेमधून चर्चा केली जात आहे
येत्या दोन दिवसांमध्ये जर कोरेगाव तालुका पोलीस स्टेशन गाव कामगार तलाठी आणि वन विभाग अधिकारी यांनी माजी दखल घेतली नाही आणि मला न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे संबंधित तक्रारदार यांनी सातारा न्यूजशी बोलताना सांगितलेले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला