धर्मादाय आयुक्‍तांच्या रडारवर गणेश मंडळे ; विनापरवाना उत्सव साजरा करणे भोवणार

पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही मंडळाने वर्गणी गोळा करू नये. गणेश मंडळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात गैरप्रकार आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा. सी. एम. ढबाले, सहाय्यक धर्मादाय आयुक्त.

सातारा :  गणेशोत्सव महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गल्लीबोळातील लहान मोठ्या मंडळांनी पावती बुक छापून वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. मात्र, हे करताना सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे काही सार्वजनिक मंडळे विसरली आहेत. परवानगी न घेणारी मंडळे धर्मादाय आयुक्‍तांच्या रडारवर असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर पावती बुके छापून वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. एखाद्याने परवानगी तसेच हिशोबाचा विषय काढलाच तर उत्सवानंतर तो दिला जाईल, असे उत्तर देऊन मंडळाचे सदस्य वेळ मारून नेत आहेत. काही गणेश मंडळाचे सदस्य हिशोब मागणार्‍यांकडे जाण्याचे कटाक्षाने टाळत आहेत.
एखाद्या मंडळाने गोळा केलेल्या रकमेचा अपहार केला किंवा हिशोब देत नसेल, मंडळाच्या उद्देशालाच हरताळ फासल्यास मंडळावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणे गरजेचे आहे. त्यावर महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त अधिनियम 1950 च्या कलम 66 (क)प्रमाणे तीन महिन्यांची कैद किंवा परवानगीशिवाय गोळा केलेल्या रकमेच्या एकूण वर्गणीच्या दीडपट दंड संबंधित मंडळाला आकारण्यात येणार आहे.सार्वजनिक मंडळाने उत्सवादरम्यान धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक गणेशमंडळे याकडे दुर्लक्ष करतात. काही मंडळे कोणतीही परवानगी न घेता उत्सव साजरा करतात. परवानगी घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाला दोन महिन्यांच्या आत लेखा परीक्षण अहवाल सादर करावा लागणार आहे. उत्सवानंतर शिल्लक राहिलेली रक्‍कम जमा करणे अनिवार्य आहे. उत्सवासाठी गोळा करण्यात येणार्‍या वर्गणीसाठी 41(क) अंतर्गत तात्पुरती परवानगी देण्यात येते. ती सहा महिनेच असते.

अशी घ्या परवानगी….

परवानगीसाठी सात किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांनी मिळून ठराव घेणे गरजेचे आहे. या सदस्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, ज्या जागेवर स्थापना करावयाची आहे, त्या जागा मालकाचे परवानगी पत्र, वीज मंडळाचे ना हरकत पत्र किंवा छोट्या मंडळांसाठी ज्या घर मालकांकडून वीज घेण्यात आली आहे, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, वीजबिल, मागील वर्षीचा गणेशोत्सव हिशोब आदी कागदपत्रे गोळा करून अर्जातील माहिती भरून ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज सादर केल्यास 3 दिवसांत परवानगी मिळेल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त