हनुमान चषक पुरुष कबड्डी स्पर्धेत विजय हनुमान मंडळ प्रथम.

किडगाव येथे 60 किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.

किडगाव : किडगाव तालुका सातारा येथे  सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व विजय हनुमान मंडळाच्या वतीने 60 किलो वजनी गटासाठी पुरुषांच्या भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या हनुमान चषकाचा मानकरी किडगाव येथील विजय हनुमान मंडळाने प्रथम क्रमांक मिळवून हनुमान चषकावर आपले नाव कोरले
 व रोख रकमेचे पारितोषिक मिळविले.  स्वराज्य रक्षक वाई या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सदाशिवगड तालुका कराड या संघाने मिळवले.  उत्कृष्ट खेळाडू विजय हनुमान मंडळाच्या अखिलेश खापे यांची निवड करण्यात आली.उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वराज्य रक्षक वाई मंडळाचा  खेळाडूला पुरस्कृत करण्यात आले.
   प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिव समर्थ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी तळमावले यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सचिव शरद कुंभार यांच्याकडून तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संकल्प दूध संघ व शिवराम इंडस्ट्रीज सातारा यांच्या वतीने देण्यात आले.सर्व चषक सातारा इलेक्ट्रॉनिक चे मालक सुधीर पवार यांच्या वतीने देण्यात आले .
   स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंद्रजीत ढेंबरे, राजेंद्र शेडगे, नंदकुमार इंगवले, महेंद्रकुमार गाढवे, विनीत ढेंबरे, सुधीर पवार,अजय इंगवले, उमेश अहिरे, आदित्य इंगवले, आदम पठाण, प्रशांत इंगवले, निखिल शेडगे, आदित्य मेणकर,अभिषेक मेणकर मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त