विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
सकलेन मुलाणी
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
- बातमी शेयर करा

कराड ; पुणे- बंगळूर महामार्गावरील विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ उडाली. विना हेल्मेट वाहन चालकांवर यापुढेही कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील खोडशी येथे कराड वाहतूक शाखेच्या वतीने विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत तब्बल 40 विना हेल्मेट वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कराड वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी सरोजिनी पाटील व त्यांच्या पथकाने महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली. महामार्गावर पोलिसांची कारवाई होत असल्याचे पाहून अनेक वाहन चालकांची पळापळ झाली. तर बहुसंख्य वाहन चालकांनी वाहने पाठीमागे वळवून राॅंग साईडने निघून जाण्याचा प्रयत्न केला. तर काही वाहन चालकांनी सेवा रस्त्याचा आसरा घेत पलायन केले.
वाहतूक शाखेने केलेल्या या अचानक कारवाईमुळे दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहन चालकांनी स्वतःचे अपघातांपासून रक्षण करण्यासाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन यावेळी सरोजिनी पाटील यांनी केले.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
संबंधित बातम्या
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
-
तापोळा मंडलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत वारस फेरफार अदालत आयोजित
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
-
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Mon 5th Sep 2022 04:14 pm
-
महाबळेश्वर रस्त्यालगतची केबल खोदाईत झाडे असुरक्षित
- Mon 5th Sep 2022 04:14 pm