शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेले प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे हाताशी आलेली पिके अक्षरशः पावसाच्या पाण्यातून वाहून गेली. अगोदरच मागील दोन वर्षात कोरोना आणि आता पावसाचे संकट, यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे. किमान यंदाच्या दिवाळी व मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह सुखाने होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी ताबड कष्ट घेतले मात्र पावसाने त्यावर पाणी फिरवले. अशा वेळेस सरकार मायबाप म्हणून त्यांचे नैतिक दायित्व आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे मात्र अद्याप देखील सरकारकडून म्हणावी तशी पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे आता पंचनामे करून पिकाचे क्षेत्रफळ पाहून बाजार भाव प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला सरकारने तात्काळ दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यावर गंभीर्याने पाऊले पावली न उचलल्यास शिंदे फडणवीस सरकारची विरोधात दिनांक 31 ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे याची नोंद घ्यावी असा इशारा मधुकर एकनाथ जाधव सातारा जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटना यांच्या  देण्यात आले आहे. त्यावेळी मधुकर जाधव प्रकाश साबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त