राजधानीच्या शिवतीर्थाची खाऊ गल्ली होऊ देऊ नका !

Tell the food street of Shivtirtha of the capital!

सातारा  : सगळ्यांना माहीत आहे तरी गांभीर्य यावं म्हणून मुद्दाम सांगतोय की, "सातारा ही हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे"इथलं राजकारण, इथला रखडलेला विकास हा चर्चेचा स्वतंत्र विषय आहे पण जेंव्हा जेंव्हा याचं पावित्र्य राखलं जात नाही तेंव्हा होणाऱ्या वेदना असह्य असतात. म्हणून राजधानी असल्याची वारंवार आठवण करून द्यावी लागते.राजधानी, राजधानीचा अजिंक्यतारा किल्ला, छत्रपती शाहूंची राजसदर शहरातल्या ऐतिहासिक वास्तू आणि त्या मागचा जाज्वल्य इतिहास हे रोमांच उभे करणारा आहे. आधी हे लक्षात घ्यावे.आठ रस्ते आणि भुयारी मार्ग असणारे शिवतीर्थ आम्हाला परम वंदनीय. या परिसरात बॅनर लावायला बंदी करण्यासाठी केलेले आंदोलन आठवते. त्यानंतर राज्यातले हे बॅनरमुक्त ठिकाण झालं. "नो हॉर्न" ठिकाण करण्याचे आमचे प्रयत्न तत्कालीन अधीक्षक संदीप पाटलांकडे अडकलेत. याच शिवतीर्थावरील मूर्तीला "युद्धसज्जमूर्ती" असा उल्लेख सुरू करताना त्याचे मूर्तिकार बी. आर. खेडेकर यांच्याशी तासंतास घातलेला वाद असो की मूर्ती स्थापनेचा 50 वा केलेला वर्धापन दिन अश्या शेकडो घटना मनांत खोलवर अजून आहेत. आता बस्स झाला विकास, हवं पावित्र्यसहा वर्षीपूर्वी या शिवतीर्थाचे सुशोभीकरण झाले मूर्तीला पॉलिश करण्यात आले तेंव्हा इथं काम केलेल्या प्रत्येक कामगार आणि इंजिनिअर यांचे सत्कार दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या हस्ते केलेले. पण सध्या सुरू असलेले अत्यंत चुकीचे सुशोभीकरण याला प्रखर विरोध केलाय आम्ही. शिवप्रभूंच्या जीवनातले सार आणि इथं होत असलेले कुंपण कसं चुकीचे आहे आणि त्यात काय बदल असावेत हे खासदार उदयनराजे यांना सांगितले आणि त्यांनी ते मान्य करून बदलायला सांगितले आहे. ( अजून किंचितही बदल झालेले नाहीत, हे वेगळं )या काही घटनाक्रमानंतर म्हणे, या शिवतीर्थाच्या विकासासाठी केंद्राकडून 60 कोटी रुपये मिळणार आहेत. पण अश्या वेळी वाटतं की बस्स झाला तो शिवतीर्थाचा विकास. नको, नकोच आहे तो विकास. शिवतीर्थाला गरज आहे ते योग्य सन्मानाची आणि अजाणतेपणी होणाऱ्या अवहेलनेची.स्वतःची निवडणूक जिंकल्यावर हार घालताना फोटो काढायला येणारे लोक पाहिल्यावर अशीच काही भावना असते.इतक्या हलकं घेऊ नका, म्हणून"सातारा शहरात बोकाळलेली अतिक्रमणे" यावर पत्रकार-संपादक म्हणून स्वतंत्र म्हणून माध्यमांत लिहीन मात्र काल रात्री युद्धसज्ज शिवमूर्ती पुढे लागलेला भेळपुरीचा गाडा प्रचंड वेदना देऊन गेला.हात जोडून विनंती करतो....मी त्या विक्रेत्याला हात जोडून विनंती केली, "दादा नको रे इथं फक्त विक्री करुस, बाकी साताऱ्यात कुठंही जा. नेत्यांसारखी अतिक्रमण कर... काय पण कर पण दादा, शिवतीर्थावर नको रे अतिक्रमण करुस"आता "पोवईनाक्यावर एक गाडा लागला इतकंच ना, मग काय लावलाय इतका फाफडपसारा?" अशी काहींची भावना झाली असेल म्हणून  मुद्दाम सांगतो की, "दोष त्या विक्रेत्याचा नव्हता" कारण, त्या बिचाऱ्याचं हातावरचं पोट,हे महत्व असायला हवं असं कुठं आहे?संताप येणाचे कारण की, त्याला "राजधानी सातारा नगरपालिकेने" रितसर "पावती" दिली होती. ती पावती पाहिली तेंव्हा मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. आपोआप पायताण हातात घेतल्याची भावना झाली.इथं गाडा लावायला रीतसर पावती देऊन नगरपालिका अतिक्रमणाला मान्यता देणार असेल तर परम वंदनीय शिवतीर्थाची काहीच दिवसांत खाऊ गल्ली व्हायला वेळ लागणार नाही !प्रशासनाने या साऱ्याची पूर्ण खातरजमा जमा करावी आणि स्वतःला कठोर निर्णयक्षम बनवून घ्यावे. 
आम्हा सातरकरांच्या याबाबतच्या भावना टोकाच्या आहे त्या व्यक्त होणार नाहीत पण भोगायला लावतील, त्याचेही त्या-त्या वेळी ही घटना सांगून पुरावे देईनच !प्रशासन चूकच ! 
पण मूर्ती कडे पाठ करून अश्या ठिकाणी सहकुटुंब पाणी पुरी, भेळ खाणाऱ्यांना 
काय म्हणावे? किंवा काय करावे? 
हे इतर सातरकरांनी ठरवावे, 
तोवर मी येतोच प्रशासनाच्या मानगुटीवर बसून !

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला