सातारा शहरातील गोडोलीमध्ये दीड महिने बंद असणाऱ्या घरात चोरी.. पाच लाखांचा ऐवज लंपास
Satara News Team
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील गोडोलीमध्ये दीड महिने बंद असणाऱ्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील रंगराव पाटील (रा. यशोदानगर, गोडोली सातारा. मूळ रा. कोल्हापूर जिल्हा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार सुनील पाटील शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे गोडोलीत अपार्टमेंटमध्ये घर आहे. त्यांच्या बंद घरात २० जून ते ९ आॅगस्टदरम्यान चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप आणि कडी तोडून घरात प्रवेश केला.
यावेळी २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन, १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ३० ग्रॅम वजनाचा एक राणीहार, २० ग्रॅम वजनाची एक माेहनमाळ, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चार वेढणी, १० ग्रॅम वजानाचे कानातील चार टाॅप, १० ग्रॅम वजनाचा नेकलेस, २२.५ ग्रॅम वजानाचा सोन्याचा हार तसेच चांदीचा कलश, समई, ताम्हण, चांदीची वाटी, फूलपात्र, करंडा असा ऐवज नेला. याची आजच्या बाजारभावाप्रमाणे पाच लाखांहून अधिक किंमत आहे. तर तक्रारदार घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला आहे. तसेच पोलिसांनी चोरीच्या ठिकाणीही जाऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोरे हे तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 11th Aug 2023 05:37 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 11th Aug 2023 05:37 pm











