सातारा जिल्हा परिषद आरक्षण सोडत थोड्याच वेळात सुरुवात

अशी होणार सोडत जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात 3 गट व 6 गण, फलटण 9 गट 18 गण, माण 5 गट व 10 गण, खटाव 8 गट व 16 गण, कोरेगाव 6 गट व 12 गण, वाई 5 गट व 10 गण, महाबळेश्वर 2 गट व 4 गण, जावली 3 गट व 6 गण, सातारा 10 गट व 20 गण, पाटण 8 गट व 16 गण, कराड 14 गट व 28 गण अशी रचना राहणार आहे.

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण केल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेसाठी गुरुवार, दि. 28 रोजी पुन्हा आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 73 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात थोड्याच वेळात सकाळी 11 वाजता ही सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी स्वत: ही सोडत काढणार आहेत,

जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात 3 गट व 6 गण, फलटण 9 गट 18 गण, माण 5 गट व 10 गण, खटाव 8 गट व 16 गण, कोरेगाव 6 गट व 12 गण, वाई 5 गट व 10 गण, महाबळेश्वर 2 गट व 4 गण, जावली 3 गट व 6 गण, सातारा 10 गट व 20 गण, पाटण 8 गट व 16 गण, कराड 14 गट व 28 गण अशी रचना राहणार आहे.

तर पंचायत समिती गणांसाठी तालुक्याच्या ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षणामध्ये कुठे ओबीसींचे आरक्षण होणार, याबाबत उत्सुकता असून सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे. राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले आहे. साताऱ्यासाठी ओबीसींचा कोटा हा 26.4 टक्के इतकाराहणार आहे. लोकसंख्या वाढल्याने यंदा जिल्हा परिषदेचे 9 गट वाढले आहे. तर गणांमध्ये 18 ची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे आता 73 गट व पंचायत समित्यांचे 146 गण झाले आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत होणार होती. परंतु, त्याला निवडणूक आयोगाने स्थगिती आणली. आता सर्वच प्रवर्गांचे आरक्षण होणार आहे. या आरक्षण सोडतीत काय होणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यादृष्टीने अनेकांनी तयारीही सुरू केली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त