माँ तुझे सलाम..! सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा...!
- Satara News Team
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
- बातमी शेयर करा
दि.17 नोव्हेंबर 2015 रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यावेळी कार्तिकी अवघी 10 वर्षाची होती. या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले. मात्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती संतोष महाडिक देखील कणखर बाण्याच्या. सैन्याधिकारी पती शहीद झाल्यानंतर रडत न बसता त्यांनी अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंच्या लढाऊ बाण्याचा आदर्श ठेवला. स्वाती महाडिक यांनी संरक्षण प्रशासनाकडे दाद मागितली आणि एका शहीद सैन्याधिकाऱ्याची पत्नी पहिल्यांदा एक सैन्याधिकारी बनण्याचा इतिहास घडला
कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते.
मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते तर आई सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक हे 41 राजस्थान रायफल्स चे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना देशाच्या शत्रूशी लढताना दि.17 नोव्हेंबर 2015 रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यावेळी कार्तिकी अवघी 10 वर्षाची होती. या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले. मात्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती संतोष महाडिक देखील कणखर बाण्याच्या. सैन्याधिकारी पती शहीद झाल्यानंतर रडत न बसता त्यांनी अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंच्या लढाऊ बाण्याचा आदर्श ठेवला. स्वाती महाडिक यांनी संरक्षण प्रशासनाकडे दाद मागितली आणि एका शहीद सैन्याधिकाऱ्याची पत्नी पहिल्यांदा एक सैन्याधिकारी बनण्याचा इतिहास घडला. तोदेखील स्वकर्तृत्वावर, सैन्याधिकारी बनण्यासाठीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि त्यानंतरचे सर्व खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून.....
असा आदर्शवत लढाऊ बाणा रक्तातच असलेल्या लढाऊ आईबाबांची लाडकी लेक कार्तिकी वेगळी कशी बरे असू शकेल.... सैन्याधिकारी आईवडिलांचे देशप्रेमाचे संस्कार लाभलेली कार्तिकी शालेय जीवनापासूनच अष्टपैलू. इयत्ता 7 वी त असल्यापासूनच तिने "भरतनाट्यम" हा राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला नृत्यप्रकार आत्मसात करण्यास सुरुवात केली. जसे जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे तसे कार्तिकी कठोर मेहनत घेत भरतनाट्यम मध्ये पारंगत होऊ लागली. आणि आता कार्तिकी तिच्या आईबाबांसारखीच आपल्या भारतमातेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झालीय. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर... युरोपातील स्कॉटलंड या देशात एडिनबर्ग या ठिकाणी 1947 पासून सांस्कृतिक महोत्सव भरविला जातो. ज्यामध्ये देशविदेशातील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन उत्तमोत्तम कलाकारांकडून सादर केले जाते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे गेली 3-4 वर्ष हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित होऊ शकला नव्हता. नजीकच्या काळात म्हणजेच 2018 साली या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील 3 हजार 548 कलांचे 55 हजार सादरीकरणे एडिनबर्ग शहरातील 317 विविध ठिकाणी सादर करण्यात आले. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव स्कॉटलंड या देशात भरविला जातो. हा कला महोत्सव तब्बल 25 दिवस सुरू असतो. यावर्षी हा महोत्सव 5 ऑगस्ट 2022 ला सुरू होऊन 29 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहील.
अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाच्या सांस्कृतिक महोत्सवात आपल्या कार्तिकीची भरतनाट्यम नृत्यकलेतील "अरंगेत्रंम्" हा विशेष प्रकार सादर करण्यासाठी निवड झाली आहे. तिच्यासोबत तिच्या सहकारी निकिता आणि अन्यना यादेखील असणार आहेत. चेन्नई येथील "कलाक्षेत्र फाईन आर्ट्स" या संस्थेच्या गुरू श्रीमती सी. के.राजलक्ष्मी आणि पंडित राजेंद्र गंगणी यांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्वांना मिळाले आहे.
आज 30 जुलै 2022 रोजी कार्तिकी आपल्या डेहराडून येथील शाळेत आपली कला सादर करणार असून ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात ती आपली कला स्कॉटलंड या देशातील मधील एडिनबर्ग या शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सादर करील. या वयात पितृछत्र हरविलेल्या भारतीय विद्यार्थिनीने आपल्या देशाचे, आपल्या शाळेचे या महोत्सवात प्रतिनिधित्व करण्याची स्वकर्तृत्वाने संधी मिळविणे, या यशाचे शब्दात वर्णन करणे तसे कठीणच आहे. एक प्रकारे कार्तिकीने वीरमरण पत्करलेल्या आपल्या वडिलांना आणि आता सध्या सैन्यात सैन्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या आईला आपल्या कर्तृत्वाने जणू कडक सलामीच दिली आहे ....
कार्तिकी आणि तिच्या सहकाऱ्यांना संपूर्ण भारत देशवासियांकडून लाख लाख शुभेच्छा..! जय हिंद..!
स्थानिक बातम्या
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आजपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब 'मॅप्रोवर कारवाई झालीच नाही ओ'?
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच पेशंटचा मृत्यू झाला असल्याचा डॉ. भूषण पाटील यांचा दावा
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
किरकोळ कारणावरून पत्नीचा नवऱ्याने दाबला गळा, बायकोचा झाला मृत्यू
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
संबंधित बातम्या
-
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आजपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीचे मार्गदर्शन
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
डॉ. शिवाजीराव कदम यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार जाहीर
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडीं
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
आंधळीत उद्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वर्धापन दिनाचे आयोजन
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Sat 30th Jul 2022 02:12 pm
-
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Sat 30th Jul 2022 02:12 pm