कोल्हापूर जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्तपदी विशाल घोडके यांनी पदभार स्वीकारला........

सातारा : भणंग तालुका जावळी येथील मुळ रहिवाशी असलेले प्रा. विजयकुमार घोडके यांचे सुपुत्र विशाल घोडके हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असून 2011च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते राज्यात विक्रमी मार्क सातवे उत्तीर्णप्राप्त विद्यार्थी आहेत. राज्य शासनाचा कामगार विभागाच्या सहाय्यक कामगार आयुक्तपदी त्यांची नियुक्ती पालघर येथून सुरू झाली त्यानंतर ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर. पुणे व सोलापूर येथील अतिरिक्त कारभार सांभाळून आपल्या आदर्श कामाचा ठसा उमटवून जनसामान्यांचे अधिकारी म्हणून त्यांची अनेक जिल्ह्यांतील कामगार वर्गातून चर्चा होत असते. त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना कोल्हापूर या कामगारांची नगरी म्हणुन प्रसिध्द आलेल्या जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्तपदी नुकतीच बदली करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कामगार वर्गातून स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिक्षक ते प्राध्यापक म्हणून नावं प्राप्त आलेल्या प्रा. विजयकुमार घोडके यांच्या आदर्श व ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रस्तुत प्रतिनिधीकडे बोलत असुन ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी संगणकीय युगात पुढे जाण्यासाठी कष्ट करण्याची जोखीम असावी असे मत व्यक्त करून जिल्ह्यातील विविध विभागांतील कामगार बांधकाम कामगार व सुरक्षारक्षक यांना जास्तीतजास्त सहकार्य करुण त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलुन जिल्ह्यातील अनेक शासकीय निमशासकीय नवीन आस्थापना नोंदणी करून जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक नोंदणी करून गार्डबोर्ड वाढविण्यावर  भर दिला जावून सर्व संघटनांशी चर्चा करून जास्तीत जास्त नवीन आस्थापनाच्या नोंदी करण्यास प्राध्यान्य देणार असल्याची माहिती घोडके यांनी दिली कक्ष अधिकारी यांनी स्वागत केले.......

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त