सातारा शहरातील करंजे येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलीसांचा छापा

सातारा  : सातारा शहरातील करंजे येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अचानक छापा टाकला. यामध्ये सुमारे ४३ हजार ९१२ रुपये रक्कम आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील करंजे नाका येथे प्रमिला मागाल कार्यालयाच्या पाठीमागे आडोशाला जुगार सुरु असल्याची माहिती पोलसांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार अड्यावर नितीन अनिल कुऱ्हाडे, भीमराव बाळू चव्हाण, अनिल लक्ष्मण वाघमारे, गंगाराम सर्जेराव दळवी, अब्दुल अजीज मोहम्मद हनीफ शेख, उमेश लक्ष्मण झोरे हे जुगार खेळात असल्याचे दिसून आले.

यावेळी शाहूपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. तसेच जुगार अड्डयावरून ४३ हजार ९१२ रुपये रक्कम आणि जुगाराचे साहित्य, २ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. या कारवाईचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे अधिक तपास करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला