सेल्फमेड' हे पुस्तक नवीन पिढीला प्रेरणा देणारे ठरणार! डॉ.श्रीपाल सबनीस

पाटण : सेल्फमेड' हे पुस्तक नवीन पिढीला प्रेरणा देणारे आणि नवीन पिढी घडवणारे ठरणार आहे.या पुस्तकाचा प्रवास हा दुर्गम भागातून शहराकडे झालेला आहे.त्यामुळे ग्रामीण साहित्य आणि शहरी साहित्य यांचा सुरेख संगम या पुस्तकात पाहायला मिळतो.सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.सुधाकर न्हाळदे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
न्हाळदे यांच्या आत्मकथन पर पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. न्हाळदे स्वतःच्या वेदनेचा प्रवास,अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे होणारा प्रवास,चांगल्याला चांगले म्हणणे तसेच जगण्यात प्रामाणिकपणा असणे अशा त्यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाचा प्रवास या पुस्तकात वाचावयास मिळतो.असेही मत,सबनीस यांनी व्यक्त केले.
 डॉ.सुधाकर न्हाळदे लिखित "सेल्फमेड" या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन झाले.त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर,ज्येष्ठ अभ्यासक वसंतराव गाडगीळ, पुस्तकाचे लेखक डॉ.सुधाकर न्हाळदे,सुसंगत फाउंडेशनच्या सचिव संगीता न्हाळदे,यशोदीप पब्लिकेशनच्या प्रकाशिका रूपाली अवचरे,निखिल लंभाते आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे
 अभ्यासक डॉ.अशोक कामत होते.  
"काहीतरी चांगलं करत रहा असे सांगणारा,माणसातील माणूस शोधणारा,हा माणूस असून समाजाला आपल्याकडून काय देता येईल याचा विचार डॉ.न्हाळदे नेहमीच करतात.हे आपल्याला जाणवते"असे मत डॉ.अशोक कामत यांनी व्यक्त केले. तर गोयल यांनी न्हाळदे यांच्या बरोबरच्या आठवणी सांगितल्या त्यांच्यात सामाजिक जाणीवेतून काम करण्याची उर्मी असल्याने त्यांचं व्यक्तिमत्व सर्व समावेशक असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केले.

 यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पुस्तकाबाबतचे मनोगत लेखक डॉ.न्हाळदे यांनी व्यक्त केले.यासोबतच प्रकाशक  रूपाली अवचरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक सोनवलकर आणि जागृती कुलकर्णी यांनी केले.
---------

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त