तब्बल २३ वर्षांनी भारताने घेतला श्रीलंकेचा बदला,

कोलंबो : भारताने फक्त ५० धावांत श्रीलंकेला ऑल आऊट केले. पण ही दमदार कामगिरी करत असताना भारताने तब्बल २३ वर्षांनी हा बदला घेतल्याचे आता समोर आले आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांच्यात २००० साली वनजे सामना झाला होता. या सामन्यात श्रीलंकेने भारताची अशीच अब्रु काढली होती. पण आता मात्र भारताने त्या गोष्टीचा चांगलाच बदला घेतला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तो सामना झाला होता २० ऑक्टोबर २००० या दिवशी. त्यावेळी श्रीलंकेचा कॅप्टन होताा धडकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्या, तर भारताचे कर्णधार होते सलामीवीर सौरव गांगुली. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सनथ जयसूर्याने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. जयसूर्याने तब्बल २१ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यावेळी जयसूर्याला गांगुलीनेच बाद केले होते. या सामन्यात रसेल अरनॉल्डनेही ५२ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे श्रीलंकेला या सामन्यात भारतापुढे ३०० धावांचे आव्हान ठेवता आले होते. त्यावेळी ३०० धावांचे आव्हान हे फारच मोठे वाटायचे. कारण त्यावेळी २०० ही धावसंख्याही जिंकण्यासाठी पुरेषी समजली जायची. पण त्यानंतर भारत या आव्हानाचा पाठलाग कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

भारतीय संघ श्रीलंकेच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्यावेळी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वासने वादळ पाहायला मिळाले होते. आता या सामन्यात जसा मोहम्मद सिराजचा स्पेल होता तसाच त्यावेळी चमिंडा वासचा स्पेल होता. वासने त्यावेळी गांगुलीला ३, सचिन तेंडुलकरला ५, युवराज सिंगला ३ आणि विनोद कांबळीलाही तीन धावांवर बाद केले. त्यामुळे या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १९ अशी झाली होती. या सामन्यात सर्वात जास्त धावा या रॉबिन सिंगच्या नावावर होत्या, रॉबिनने त्या सामन्यात ११ धावा केल्या होत्या. या सामन्यात आत्ताचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरही होते. या सामन्यात आगरकर यांनी दोन धावा केल्य होत्या, तर गोलंदाजीत त्यांना एकही विकेट मिळाली नव्हती. पण १० षटकांत त्यांनी ६७ धावा दिल्या होत्या. या सामन्यात श्रीलंकेने भारताला ५४ धावांत ऑल आऊट केले होते आणि त्याचाच बदला आज भारताने घेतल्याचे पाहायला मिळाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त