नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

भंडारा : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. निवडणुकीच्या काळातच हा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नान पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. त्याच दरम्यान, भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकनं जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये  नाना पटोले आणि गाडीतील इतर प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघातानंतर पोलिसाना माहिती देण्यात आली. पोलिसांकडून या अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला आहे. मात्र नाना पटोले थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त