जीएआयटीच्या माध्यमातून विद्यार्थीनी प्रगती साधावी - व्याख्याते प्रा. देसाई
Satara News Team निसार शिकलगार - Sat 2nd Jul 2022 06:45 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज - निसार शिकलगार : वडूज येथील जीएआयटी कॅम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या एमएससीआयटी, टॅली विथ जीएसटी च्या माध्यमातून विद्यार्थांनीआपली प्रगती साधावी असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. संभाजी देसाई यांनी संस्थेच्या विद्यार्थी स्नेह मेळावा प्रसंगी वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयातील आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एमकेसीएल संस्थेचे ट्रेनिंग प्रोंव्हडर संजय चव्हाण हे होते. यावेळी भुरकवडी सोसायटीचे चेअरमन शरदराव कदम, वडूज सोसायटीचे संचालक प्रमोद गोडसे, युवा उद्योजक राजेंद्र माने, सौ माळी, सौ.आशा जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री देसाई पुढे म्हणाले की, गेली १५ वर्ष जीएआयटी कॅम्प्युटर या संस्थेने वडूज शहरासह खटाव तालुक्यात संस्थेचे नाव नावारूपाला आणले असून संस्थेचे संस्थापक अजय खुस्पे व सारिका खुस्पे यांनी ही संस्था आदर्शवत चालवून इतरापुढे आदर्श निर्माण केला आहे. यावेळी अध्यक्ष संजय चव्हाण, संस्थेच्या विद्यार्थीनी रुजूल रामदास तेली, सत्वशिला पवार यांची मनोगते झाली.
यावेळी पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम ही पार पडला. संगीत खुर्ची स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक कु.निकिता आबासो जाधव, द्वितीय क्रमांक कु. पायल राजकुमार जाधव यांना तर क्रिकेट स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक शिवछत्रपती क्लब वडूज तर द्वितीय क्रमांक मोरया क्रिकेट क्लब वडूज यांना देण्यात आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कु.ओंकार चिंचकर, उत्कृष्ट विकेट्किपर कु. तुषार पवार, उत्कृष्ट गोलंदाज कु. प्रयाग फडतरे, उत्कृष्ट फलंदाज कु.ओंकार जाधव यांना तर सचिन दडस, वैभव गोडसे, प्रमोद जाधव, प्रतिक्षा गोडसे, उज्वला खरमाटे, वर्षा शिंदे, कोमल निंबाळकर, जान्हवी लावंड, शिक्कलगार यांना संस्थेचे आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे आजी -माजी विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन नितीन मानेसर यांनी केले. प्रास्ताविक अजय खुस्पे यांनी तर आभार सारिका खुस्पे यांनी मानले.

वडूज - विद्यार्थी स्नेहमेळाव्यात बोलताना व्याख्याते प्रा. देसाई व इतर
pusegaon
vaduj
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
संबंधित बातम्या
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
-
खटाव तहसिलदारां विरोधातील तक्रार आरोपी तहसिलदारांनी स्वतःच निकाली काढली?
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 2nd Jul 2022 06:45 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Sat 2nd Jul 2022 06:45 am












