तोडीअभावी ऊसाची होऊ लागली चिपाडे.

देशमुखनगर  : जानेवारी संपला तरी आडसाली ऊस शेतात उभा आहे, उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस वाळून चिपाडे होऊ लागली आहेत. ऊस कारखान्याकडे वेळेत गेला नाही तर बँका, सोसायटी, व पतसंस्था यांची कर्जे मार्चपर्यंत कशी फेडायची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे. तोडणीसाठी अजून महिनाभर लागणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, तसेच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने तोडणी मजुरांचा दरही वाढू लागला आहे, मागील वर्षापेक्षा यावर्षी ऊस तोडणी मजुरांची मोठी कमतरता आहे त्यामुळे ऊस कारखान्याकडे गाळपास घालवण्यासाठी शेतकरी अक्षरशा हैराण झाला आहे. गट कार्यालयाबाहेर दररोज शेतकऱ्यांची मोठी गर्दी वाढू लागले आहे, सध्या तोडणीला आलेल्या बहुतांश क्षेत्रावरील उसाला तुरे आले आहेत. तोडणी करताना कारखाना कार्यालयासमोर मोठे आव्हान ठरत आहे, कर्मचारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.  तोडणी हंगाम मे अखेर लांबण्याची चिन्हे आहेत तरी कारखाना व्यवस्थापन कारखाना व्यवस्थापनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला