100 कोटी द्या,मंत्री बनवतो ....आमदारांना फसविणाऱ्या चौघांना अटक
प्रकाश शिंदे - Wed 20th Jul 2022 11:52 am
- बातमी शेयर करा
मुंबई : कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या टोळीने तीन- ते चार आमदारांना गळाला लावल्याची माहिती असून त्यातील एक पुणे जिल्ह्यातील आमदार असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या 'नंदनवन' आणि 'सागर' या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत.
नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत, मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर दोन तीन वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्री मंडळात मंत्रीपद देण्यासाठी १०० कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली.मंत्रीमंडळात सहभागासाठी नंतर ९० कोटी रुपये मागत असून त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १८ कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे आमदारांना सांगितले.
आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले.याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्यावेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपीची नावे समोर आली
एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत.आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ministry
EknathShinde
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 20th Jul 2022 11:52 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 20th Jul 2022 11:52 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 20th Jul 2022 11:52 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 20th Jul 2022 11:52 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 20th Jul 2022 11:52 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 20th Jul 2022 11:52 am
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 20th Jul 2022 11:52 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Wed 20th Jul 2022 11:52 am












