विजापूरहून आलेला 13 लाखांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी केला जप्त
Satara News Team
- Fri 29th Mar 2024 11:23 am
- बातमी शेयर करा
कराड : विजापूरहून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याकडे नेण्यात येणाऱ्या अवैध सुगंधीत तंबाखु, पानमसाला आणि गुटख्याचा ५१ पोत्यांचा सुमारे १३ लाख ६५ हजाराचा साठा विटा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित चारचाकी गाडीसह चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम (वय २२, रा. दारुज ता.खटाव, जि. सातारा) यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्यांच्याकडील मुद्देमालासह गाडीही जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुहागर ते विजापूर मार्गावर विजापूरकडुन एक बुलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेला बुधवारी अवैध रित्या गुटखा वाहतुक करत आहे, अशी माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यावर विटा पोलिसांचे पथक तयार करून भिवघाट (ता.खानापूर) येथे रवाना झाले. तेथे जावून पथकाने सापळा रचला असता, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक बुलेरो पिकअप गाडी येत असल्याचे दिसली. त्यास इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले असता तो तेथून तडक निघून गेला.
त्याचा पाठलाग करून पिकअप गाडी (नं एम.एच. ११डी.डी ४३९०) पकडले. त्यातील गाडीच्या पाठीमागील हौदयात द्राक्ष भरण्याचे कॅरेट मध्ये बेकायदेशीरपणे १३ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा विमल गुटखा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी विमल गुटखा आणि बलेरो गाडीसह एकूण २० लाख ६५ हजार रुपये रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला तर संबंधित चालक ऋषिकेश कदम यास अटक करण्यात आली आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 29th Mar 2024 11:23 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 29th Mar 2024 11:23 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 29th Mar 2024 11:23 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 29th Mar 2024 11:23 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 29th Mar 2024 11:23 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 29th Mar 2024 11:23 am
संबंधित बातम्या
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Fri 29th Mar 2024 11:23 am
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Fri 29th Mar 2024 11:23 am












