अवैध ताडी अड्डय़ावर पोलीसांचा छापा, १ लाख २४ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Police raid illegal toddy place, seized goods worth Rs 1 lakh 24 thousand 815

फलटण  : फलटण ग्रामीण पोलीसांनी अवैध ताडी अड्डय़ावर छापा टाकून सुमारे १५० लिटर ताडी जप्त करण्यात आली असून या छाप्यात १ लाख २४ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करण्यात आला आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व पोलीस हवालदार बबन रघुनाथ साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना अवैध ताडी विक्री बाबत माहिती मिळाली. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास गुणवरे ता. फलटण गावचे हद्दीत बंडा आण्णासाहेब जाधव यांचे बंद घराचे समोर हिरव्या नेटचे आडोशास संशयित अशोक इरन्ना भंडारी ( वय ४७ वर्षे राहणार गिरवी ता. फलटण ) हा त्याच्याकडे असलेली ताडी लोकांनी प्यायल्यावर त्यांना नशा येऊन आरोग्यास दुखापत होवु शकते अथवा एखादयाने जास्त पिल्याने त्यास मरण येऊ शकते, हे त्याला माहीत असताना सुध्दा तो ताड़ी बेकायदेशीररित्या २०० रुपये प्रती लिटर दराने बेकायदेशिर रित्या विक्री करीता ३५ लिटरची ३ प्लॅस्टीकचे कॅन व १५ लिटर मापाचे ३ प्लॅस्टीकचे कॅन मध्ये एकूण १५० लिटर ताडी व मोबाईल हँडसेट, स्कुटी गाडी , रोख रक्कम, साहीत्य जवळ बाळगले स्थितीत आढळून आला आहे.त्याचे विरुध्द भारतीय दंड विधान संहिता सह मुंबई दारु अधिनियम कलम 65 ( ई ) प्रमाणे कायदेशिर फिर्याद देण्यात आली असून सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहायक पोलीस फौजदार सुर्यवंशी, पोलीस हवालदार बबन साबळे, पोलीस हवालदार अमोल कर्णे, पोलीस हवालदार दिपक बडे, पोलीस काॅन्सटेबल गणेश अवघडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट या पोलीस पथकाने केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त